कल्याण जवळील शहाड येथील रेल्वे उड्डाण पुलावर रविवारी दुपारी दुचाकी वरुन चाललेल्या महिलेचा पुलावरील खड्डे चुकवित असताना अचानक तोल गेला. दुचाकी जोरात खड्ड्यात आपटून ती दुचाकीसह खड्ड्यात पडली. याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील टँकर खाली येऊन या महिलेचा जागीच चिरडून मत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खराब रस्ते, खड्डे विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. खड्डे अपघाता मधील कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील हा सहावा बळी आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथे गुटख्याचा एक लाखाचा साठा जप्त

कविता प्रशांत म्हात्रे (३०) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. ती कल्याण पूर्वेतील टाटा नाका भागातील शहीद अरुण चित्ते पेट्रोल पंपावर नोकरीला होती. ती कल्याण जवळील म्हारळ येथे राहते. रविवारी दुपारी कविता पेंट्रोल पंपावर आपल्या कर्तव्यावर निघाली होती. नेहमी ती दुचाकीवर येजा करते. शहाड रेल्वे उड्डाण पुलावरुन कविता खड्डे चुक

वत दुचाकी चालवित होती. खड्डे चुकवत जात असताना अचानक कविताचा तोल गेला. तिची दुचाकी खड्ड्यात आपटली. ती दुचाकी वरुन खाली पडून दुचाकी एका बाजुला आणि ती एका बाजुला फेकली गेली. रस्त्यावर पडताच त्याच वेळी तेथून एक भरधाव वेगाने टँकर जात होता. त्या टँकर खाली कविता आल्याने तिचा जागीच चिरडून मृत्यू झाला.

हेही वाचा >>> गणपती बाप्पाला फुलांचा हार आणण्यासाठी गेले, भामट्यांनी ६० हजाराला लुटले ; कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीतील घटना

पुलावर खड्डयांच्या बाजुला मातीचे उंचवटे तयार झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकाला खड्डे चुकवत. या उंचवट्यांना तोंड देत वाहने चालवावी लागतात. त्याचा फटका कविता म्हात्रे यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेऊन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून हा अपघात नेमका कशामुळे झाला. टँकरचा वेग किती होता याचा तपास सुरू केला आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कविताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. या अपघातामुळे म्हारळ गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

आतापर्यंतचे अपघात
२ जुलै २०२२ – म्हारळ येथे खड्डे अपघातात नारायण भोईर दूध विक्रेत्याचा मृत्यू.
४ जुलै- गणेश सहस्त्रबुध्दे ज्येष्ठ नागरिक टिळक चौकात खड्ड्यात पाय मुरगळून जखमी
६ जुलै- सनदी लेखापाल कल्याण टिळक चौकात खड्ड्यात पाय मुरगळून गंभीर जखमी
१६ जुलै- पलावा खोणी येथे अंकित थवा या तरुणाचा खड्ड्यात दुचाकी आपटून मृत्यू
२७ जुलै- आशेळे माणेरे रस्त्यावर गणेश वसुमानी यांचा खड्ड्यात दुचाकी आपटून मृत्यू