लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: येथील पारनाका भागात शनिवारी एका रिक्षा चालकाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे एका पादचारी महिलेला जोराची धडक दिली. धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी साहाय्य करण्याऐवजी आरोपी रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेला.

योजना सचिन डाके (४०, रा. गौरवप्रसाद सोसायटी, पारनाका, कल्याण) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, योजना आणि त्यांची मुलगी शनिवारी सकाळी गांधी चौक ते पारनाका भागातून पायी चालल्या होत्या. पारनाका भागातून रस्त्याच्या कडेने चालत असताना अचानक एक रिक्षा चालक भरधाव वेगाने पाठीमागून आला. त्याने योजना डाके यांना पाठीमागून जोराची धडक मारली. या धडकेत योजना यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा… डोंबिवलीत गावदेवी जवळील बेकायदा इमारत तोडण्यासाठी पुरेसे पोलीस बळ द्या; उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश

आपल्या हातून अपघात झाला आहे हे माहिती असुनही जखमी पादचारी महिलेला मदत करण्याऐवजी संबंधित अज्ञात रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेला. योजना डाके यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकाविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman was injured in a collision with a rickshaw in paranaka area in kalyan dvr
Show comments