कल्याण – मुंबईतील एका तरूणीला तिच्या मैत्रिणीने बदलापूर येथे बोलावून घेतले. या तरूणीला मैत्रिण आणि तिच्या मित्राने बदलापूर येथील एका पाण्याच्या टाकीजवळ बिअर पाजली. या तरूणीची शुध्द हरपल्यानंतर एकाने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने बदलापूर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली आहे.

मुंबईत राहणारी ही १९ वर्षाची तरूणी शिक्षण घेत आहे. ती कुटुंबीयांसह मुंबईत राहते. या प्रकरणात बदलापूर पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दत्ता जाधव, नायर (पूर्ण नाव नाही) या संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

पीडित तरूणीने बदलापूर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी आपली मैत्रिण नायरा हिने आपणास बदलापूर येथे बोलावून घेतले. यावेळी तिच्या सोबत तिचा मित्र दत्ता जाधव होते. बदलापूर येथे आल्यानंतर मैत्रिण नायराने पीडित तरूणीला बदलापूर येथील पाण्याच्या टाकीजवळ बोलावून घेतले. तेथे नायरा आणि दत्ता जाधव यांनी पीडित तरूणीला विश्वासात घेतले. तिला तेथे बिअर पाजण्यात आली. बिअर प्यायल्यानंतर पीडित तरूणीची शुध्द हरपली. पीडित तरुणी शुध्दीत नसल्याचे पाहून संशयित दत्ता जाधव यांनी आपणावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यामुळे आपण या दोघांविरुध्द तक्रार देत आहोत, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. भारतीय न्याय संंहितेच्या कलम ६४(१), ६९, ३ (५) प्रमाणे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा तपास करत आहेत.

बदलापूर येथील पीडितेच्या तक्रारीवरून दत्ता जाधव यांना अटक करण्यात आली आहे. पीडितेची मैत्रिण नायराचे पूर्ण नाव, तिचा पत्ता पीडित तरूणीला माहिती नाही. पीडित तरूणीला बदलापूर शहराची ओळख नाही. गुन्हा घडल्या घटनेचे ठिकाण आणि इतर माहिती जमा करण्यात अडथळे येत आहेत. नायराचा मोबाईल क्रमांक मिळविला आहे. तिचा शोध पोलीस पथकाकडून घेतला जात आहे.-अनु शर्मा,महिला पोलीस उपनिरीक्षक, बदलापूर पोलीस ठाणे.

Story img Loader