लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: पाच वर्षापूर्वी डोंबिवलीतील एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फसवून स्वताच्या घरात आणून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका २४ वर्षाच्या तरुणाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. अस्थुरकर यांनी सक्तमजुरी आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
Naga Sadhus in Kumbh Mela
Maha Kumbh Mela 2025: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Tensions rise after cattle parts found under Khed Devane bridge
खेड देवणे पुलाखाली गोवंशाचे अवयव सापडल्याने तणाव
Macoca , Demand of Marathi family,
मराठी कुटुंबांना मारहाण करणाऱ्या मुख्यसुत्रधारासह मारेकऱ्यांना ‘मोक्का’ लावा, मराठी कुटुंबीयांची पोलिसांकडे मागणी
kalyan east marathi family case, immigrant family complaint, marathi family,
कल्याण पूर्वमध्ये मराठी कुटुंबानेही मारहाण केल्याची परप्रांतियांची तक्रार

विशाल दीपक भिंगारदेव असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. साहाय्यक सरकारी वकील ॲड. पाटील-भामरे यांनी न्यायालयाला सांगितले, आरोपी विशाल भिंगारदेव याची बहिण आणि पीडित मुलगी या मैत्रिणी असुन त्या शाळेत एका वर्गात शिकतात. त्यामुळे विशालची पीडिते बरोबर ओळख होती. पीडितेचे विशालच्या घरी त्याच्या बहिणीमुळे येणे जाणे होते. मार्च २०१८ मध्ये पीडित मुलगी आपल्या लहान बहिणीला शाळेत सोडून घरी परतत होती. त्यावेळी वाटेत तिला आरोपी विशाल भेटला. त्याने पीडितेला माझी बहिण तुला भेटू इच्छिते असे खोटे सांगितले. तिला आपल्या घरी घेऊन गेला. घरात कोणीही नसल्याने ती गोंधळली.

हेही वाचा… कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून ३१ गर्दुल्ले, भिकाऱ्यांना अटक

दरम्यान, आरोपी विशालने घराचा दरवाजा बंद करुन तिला काही कळून न देण्याच्या आत तिच्यावर बलात्कार केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने पीडिता घाबरली. तिने बचावासाठी प्रयत्न केले. त्यावेळी विशालने तिला हा विषय कोठे बोललीस तर तुला बघून घेईन अशी धमकी दिली. विशालच्या तावडीतून सुटका झाल्यावर ती घरी गेली. घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विशाल भिंगारदेवला अटक केली होती.

हेही वाचा… ठाणे: नौपाड्यात वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली

मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असुनही आरोपी विशालने तिला फसवून घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याने पीडितेचा विश्वासघात केला. त्यामुळे तो सक्तमजुरी या शिक्षेला पात्र आहे असे न्यायालयाने सांगितले.

Story img Loader