इन्टाग्रामवर मैत्री झालेल्या कल्याण मधील एका तरुणाने डोंबिवलीतील आपल्या मित्राला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. डोंबिवलीच्या मित्राने कल्याणच्या मित्राला ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात मंगळवारी संध्याकाळी भेटण्यासाठी बोलविले. भेटीच्या वेळी कल्याणच्या मित्राने डोंबिवलीच्या मित्राला त्याची दुचाकी एक फेरा मारण्यासाठी मागितली. दुचाकीचा ताबा मिळताच कल्याणचा मित्र दुचाकी घेऊन फरार झाला.

हेही वाचा >>>ठाणे शहर सौंदर्यीकरणाच्या कामात कुठेही तडजोड नको ; आयुक्त अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल

अनेक महिने इन्स्टाग्रामवर आपुलकीने बोलणाऱ्या मित्रानेच विश्वासघात केल्याने डोंबिवलीकर मित्र अस्वस्थ झाला आहे. दोन दिवस त्याने फरार मित्राचा शोध घेतला. त्याला इन्स्टाग्रामवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. आपली ९० हजार रुपये किमतीची दुचाकी मित्राने विश्वासघात करुन चोरुन नेली म्हणून डोंबिवलीकर मित्राने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी सांगितले, करण सागवेकर (१८, रा. शिव अमृत चाळ, सरोवर नगर, डोंबिवली पश्चिम) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. त्याचा इन्स्टाग्रामवरील मित्र अनिकेत वाडेकर (१९) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार करण आणि अनिकेत हे इन्स्टाग्रावरील एकमेकांचे मित्र आहेत. अनेक महिने ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघांनी एकमेकांचा विश्वास संपादन केला होता. मंगळवारी करण आपली दुचाकी घेऊन कार्यालयात गेला होता. यावेळी आरोपी अनिकेत याने करणला आपण प्रत्यक्ष भेटून गप्पा मारू असे बोलू लागला. करणने त्याला मंगळवारी संध्याकाळी ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक भागात भेटण्यासाठी बोलविले. करण त्याच्या दुचाकीने रेल्वे स्थानक भागात पोहचला. त्यावेळी करण लोकलने ठाकुर्ली येथे आला.

हेही वाचा >>>नियमित, बेकायदा इमारतींची माहिती दाखल करा; पोलिसांच्या तपास पथकाचे कल्याण-डोंबिवली पालिकेला आदेश

त्यांची भेट झाली. अनिकेतने करणला तुझी दुचाकी खूप छान आहे. रंग छान आहे असे बोलत तुुझी दुचाकी मला चालवायला दे. मी एक फेरा मारून येतो असे म्हणाला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन करणने दुचाकीचा ताबा दिला. दुचाकी घेऊन अनिकेत फेरा मारुन येईल म्हणून करण वाट पाहत राहिला. अर्धा तास झाला तरी अनिकेत दुचाकी घेऊन येत नाही म्हणून करण अस्वस्थ झाला.त्याने ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात जाऊन अनिकेत दुचाकीवरुन पडला आहे. त्याच्या दुचाकीला अपघात झाला म्हणून तो आला नाही की काय असे तर्क काढत फिरत राहिला. दोन तास फिरुनही अनिकेत आढळून आला नाही. तो मोबाईल, इन्स्टाग्रामवरही करणला प्रतिसाद देईनासा झाला. गोड बोलून अनिकेतने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर करणने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. के. निकम तपास करत आहेत.

Story img Loader