डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव भागातील ज्योतीनगर झोपडपट्टीतील जलकुंभा जवळ पिस्तुल बाळगून परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका तरुणाला रामनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेबारा वाजता शिताफीने अटक केली. या तरुणाला पकडल्यानंतर ज्योतीनगर भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बेभान झालेला हा तरुण पिस्तुलचा दुरुपयोग करुन काही घातपात करण्याची भीती रहिवाशांना वाटत होती. या तरुणावर रामनगर पोलिसांनी बेकायदा शस्त्र हाताळणी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरुन गुन्हा दाखल केला.

पोलीस अंमलदार वैजीनाथ रावखंडे या प्रकरणात तक्रारदार आहेत. पोलिसांनी सांगितले, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत गस्त घातली जाते. पोलीस व्हॅन, दुचाकीचा यासाठी वापर केला जातो. पोलीस अंमलदार वैजीनाथ रावखंडे, साथीदार अनिल राऊत हे रामनगर पोलीस ठाणे हद्दीत रात्री १२ वाजता गस्त घालत होते. त्यांना पोलीस ठाण्यातून कळविण्यात आले की, आयरे गावातील ज्योतीनगर झोपडपट्टीत एक तरुण नागरिकांची झोपमोड करुन, शांततेचा भंग करुन आरडाओरडा करत आहे. त्याच्या जवळ पिस्तुल आहे. तो त्याचा दुरुपयोग करुन येथे काही दुर्घटना करू शकतो, अशी माहिती मिळाली. रावखंडे, राऊत हे गस्तीवरील दोन्ही पोलीस तातडीने ज्योतीनगर झोपडपट्टीत गेले. तेथे त्यांना ५० हून अधिक रहिवासी जमावाने जमल्याचे दिसले. त्या गर्दीत एक तरुण बेभान होऊन आरडाओरडा शिवीगाळ करत होते. रहिवासी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. तो त्यास दाद नव्हता. हा तरुण बेभान असल्याने तो ताब्यात येणार नसल्याने पोलिसांनी पोलिसांची वाढीव कुमक मागविली. पोलिसांच्या पथकाने शिताफिने या तरुणाला अटक केली. पोलीस येण्यापूर्वीच रहिवाशांनी या तरुणाला प्रसाद दिला होता. तो जमावाला ऐकत नव्हता.

पोलिसांच्या पथकाने आयरे गाव शाळेजवळ तरुणाला कोंडीत पकडले. त्याला पोलीस व्हॅनमध्ये घातले. त्याची जमावा समोर अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्तुल, दोन जिवत काडतुसे आढळली. पिस्तुल कोठुन आणले. त्याचा परवाना याची कोणतीही माहिती तरुण देऊ शकला नाही. तरुणाने आपले नाव महेश भुऱ्या उर्फ रमेश चंदनशिवे (२८, रा. ज्योतीनगर झोपडपट्टी, पाण्याच्या टीकाजवळ, आयरेगाव, डोंबिवली पूर्व) असे सांगितले.

पिस्तुलची किमंत ३५ हजार रुपये आहे. महेशला जमावाने चांगला प्रसाद झाल्याने त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी महेशने पिस्तुल, जिवंत काडतुसे कोठुन आणले याचा तपास सुरू केला आहे. महेश विरुध्द हत्यार प्रतिबंधित कायदा कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.