आधाररेखा..
tvlog02‘ज्याचे त्याला कळते’ या उक्तीप्रमाणे एकाच अनुभवातून जाणाऱ्या व्यक्तींना एकमेकांचा आधार वाटत असतो. त्यातूनच निरनिराळे स्व-मदत गट स्थापन होत असतात. अशाच प्रकारे कॅन्सरचे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना मानसिक, भावनिक आधार देण्यासाठी ठाण्यात दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘आधाररेखा’ या संस्थेचा द्वितीय वर्थापन दिन येत्या रविवारी ३ मे रोजी ठाण्यात साजरा होतोय. त्यानिमित्ताने या संस्थेविषयी..

आता वैद्यकीय क्षेत्रात बरीच प्रगती झाल्याने पूर्वीइतकी कॅन्सर ही असाध्य व्याधी राहिलेली नाही. योग्य वेळी लक्षात आलेल्या कॅन्सरला आटोक्यात आणण्यात आधुनिक वैद्यकशास्त्राला यश आले आहे. योग्य तो उपचार आणि पथ्ये पाळली की इतर आजारांप्रमाणेच कॅन्सरमधूनही व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन नव्याने आपले आयुष्य जगू शकते. त्याचप्रमाणे समाजातही आता कॅन्सरविषयी बरीच जागृती झालेली आहे. कॅन्सरविषयीच्या सर्व अंधश्रद्धा आणि गैरसमजुती आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे कॅन्सरने गाठलेल्या रुग्णाला पूर्वीसारखी समाजाकडून हीन वागणूक दिली जात नाही. अशा प्रकारे कॅन्सरवर विजय मिळविण्यात बऱ्याच प्रमाणात यश आलेले असले तरी या व्याधीमुळे मनावर होणारा आघात न भरून येणारा असतो. कॅन्सरची लागण झालेली व्यक्ती मनाने खचून गेलेली असते. वैद्यकीय उपचारांनी कॅन्सरमुक्त झालेले अनेक रुग्ण त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने दगाविल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही आपला आत्मविश्वास गमावून बसतात. काही समाजात मिळसेनासे होतात. ‘हे आपल्यालाच का’ या विचाराने काहींचा स्वभाव चिडचिडा होतो. कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांचे खटके उडू लागतात. त्यातून ती व्यक्ती एकलकोंडी तरी होते, वा कुढत तरी बसते. रुग्ण महिला असेल तर तिचे प्रश्न आणखी वेगळे असतात. केमोथेरेपीमुळे केस गळतात. अशा वेळी त्यांना इतरांपेक्षा अशाच प्रकारच्या अनुभवातून गेलेल्या अथवा जाणाऱ्यांच्या मदतीची आवश्यकता असते.
पेशाने सनदी लेखापाल असणाऱ्या ठाण्यातील अरविंद जोशी यांना असेच २००५ मध्ये कॅन्सरने गाठले. योग्य उपचार, कुटुंबीयांनी दिलेला धीर यामुळे ते या व्याधीतून सहीसलामत बाहेर आले. मात्र आजारपणाच्या काळात कॅन्सर रुग्णाला कोणकोणते प्रश्न भेडसावतात, हे त्यांनी अनुभवले. त्यातूनच एखाद्याला कॅन्सर झालाच तर इथपासून इतिपर्यंत माहिती आणि मदत करणारी एखादी स्वयंसेवी असावी, असे त्यांना वाटू लागले. इतर कुणी तरी करण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच ते का करू नये या विचाराने त्यांनीच पुढाकार घेतला आणि आधाररेखा संस्थेचा जन्म झाला. ठाण्यातील कौशल्य मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. हरिकांत भानुशाली यांनी ‘आधाररेखा’मध्ये प्रमुख विश्वस्त या नात्याने सहभाग नोंदविला. डॉ. अनिल हेरूर, श्रीनिवास मराठे, साधना वझे, सुभाष आठवले, अरविंद जोशी यांच्या पत्नी रश्मी जोशी आदींनी सक्रिय सहभाग घेतला आणि दोन वर्षांपूर्वी कॅन्सर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मदत आणि मार्गदर्शन करणारी संस्था म्हणून ‘आधाररेखा’ची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीच्या काळात आधाररेखा एक स्व-मदत (हेल्पग्रुप) एवढय़ापुरतीच मर्यादित होती. मात्र मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तिला पुढील काळात संस्थात्मक रूप देण्यात आले. आता ही संस्था नोंदणीकृत असून आतापर्यंत ठाणे-बदलापूर परिसरातील तब्बल १५० कॅन्सर रुग्णांनी ‘आधाररेखा’चा आधार घेतला आहे. त्यातील ५० हून अधिक जण स्वयंसेवक अथवा कार्यकर्ते म्हणून कायमस्वरूपी संस्थेशी जोडले गेले आहेत.
व्याख्याने आणि अनुभवकथन
सध्या ठाण्यातील पाचपाखाडी येथील कौशल मेडिकल फाऊंडेशनच्या तळमजल्यावरील सभागृहात आधाररेखाचे सभासद महिन्या-दोन महिन्यांतून एकदा भेटतात. कॅन्सरविषयक व्याख्यान, मार्गदर्शन, अनुभवकथन असे या भेटीचे स्वरूप असते. कॅन्सर रुग्णांना धीर देण्यासाठी सरपोतदार दाम्पत्याने ‘वुई कॅन सरटनली वीन’ हा माहितीपट तयार केला आहे. ‘आधाररेखा’च्या सभासदांसाठी तो दाखविण्यात आला. ‘आधाररेखा’च्या कार्यकारी मंडळातही काही तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. तेही मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात.

district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Financial assistance, inter-caste marriages, eligible
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत, कोण ठरेल पात्र?

योगवर्ग आणि वाचनालय
कॅन्सरच्या व्याधीतून रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतरही त्याच्या मनात शंकांचे काहूर कायम असते. त्यामुळे अशा कातर मनाच्या मशागतीसाठी योगविद्या उपयुक्त ठरते. ‘आधाररेखा’द्वारे नौपाडय़ातील मीनल चिलेकर यांच्या निवासस्थानी कॅन्सर रुग्णांसाठी सहा महिने कालावधीचे योग वर्ग घेतले जातात. ते विनामूल्य असतात. आठवडय़ातून दोन ते तीन दिवस वर्ग भरतात. त्यात प्रामुख्याने प्राणायाम आणि मंत्रोच्चार शिकविले जातात. या योगवर्गाचा खूप फायदा होतो, असा कॅन्सर रुग्णांचा अनुभव आहे. या योगवर्गाला जोडूनच कॅन्सरविषयक माहिती देणाऱ्या पुस्तकांचा संग्रह असलेले वाचनालय संस्थेच्या वतीने चालविले जाते. सध्या या संग्रहात ४० पुस्तके आहेत. त्यात काही कॅन्सर व्याधी केंद्रस्थानी असलेले कथासंग्रह तसेच कादंबऱ्याही आहेत.

डॉक्टर्स आणि रुग्णालयांची सूची
कॅन्सरचे निदान झाले की कुठे उपचार करायचा असा प्रश्न रुग्ण तसेच कुटुंबापुढे उभा राहतो. ती गरज ओळखून ‘आधाररेखा’ने ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील कॅन्सरविषयक उपचार करणारे डॉक्टर्स तसेच रुग्णालयांची सूची तयार केली आहे. सभासदांना त्याचा लाभ घेता येतो.

शिबिरे, औषधोपचारांचा संकल्प
गेली दोन वर्षे आधाररेखा सर्वसाधारणपणे रुग्णांना केवळ मार्गदर्शन आणि प्रशिक्षण करीत आहे. आता मात्र पुढील टप्प्यात सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे तसेच कॅन्सर निदान शिबीर आयोजित करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. कॅन्सर निदान शिबीर अतिशय उपयुक्त ठरतात. कारण त्यातून प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर लक्षात येऊन योग्य वेळी उपचार करता येतात. मात्र शंभर जणांच्या तपासणीची सोय करायची असेल तर साधारण ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे देणगीदार शोधून अशा प्रकारची शिबिरे भरविण्याचा प्रयत्न आधाररेखा करणार आहे. सध्या आधाररेखाचे कुठेही कार्यालय नाही. अरविंद आणि रश्मी जोशी यांचे घर हेच संस्थेचे कार्यालय आहे. समाजातील संवेदनशील आणि दानशूर व्यक्तींनी संस्थेच्या आगामी उपक्रमांसाठी यथाशक्ती मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. संपर्क-अरविंद जोशी-९९६९०३८८१४. रश्मी जोशी-९८६९४६५१४४.

‘आधाररेखा’ला ‘आस्था’ची जोड
दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘आधाररेखा’संस्थेने रविवार ३ मे रोजी सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प.) येथे संध्याकाळी पाच वाजता ‘हिलिंग हार्मनी’ हा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पुण्यातील आस्था या संस्थेचे डॉ. शेखर कुलकर्णी आणि त्यांचे कॅन्सर व्याधीमुक्त झालेले रुग्ण हा कार्यक्रम सादर करणार आहेत. ‘आधाररेखा’प्रमाणेच ‘आस्था’ पुण्यात कॅन्सर रुग्णांसाठी हेल्पग्रुप म्हणून काम करते. दोन गाण्यांदरम्यान कॅन्सर या व्याधीविषयी माहिती दिली जाते. अशा प्रकारे ठाण्यातील ‘आधाररेखा’ला पुण्यातील ‘आस्था’ची जोड मिळाली आहे.
प्रशांत मोरे

Story img Loader