डोंबिवली: वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोहण्याचे धडे घेत असलेल्या डोंबिवलीतील आरव गोळे या १० वर्षाच्या विद्यार्थ्याने धरमतर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया हे ३९ किलोमीटर अंतर आठ तास ४० मिनिटात पोहून पार केले. अल्पवयात मध्यरात्रीच्या सुमारास पोहण्यास सुरूवात करुन आरवने उगवत्या सूर्याच्या साक्षीने सागरी बदलत्या वातावरणावर मात करत गेटवे ऑफ इंडिया येथे सकाळी पोहचला.

आतापर्यंत बहुतांशी जलतरण पटुंनी हा टप्पा १२ ते १३ तासाच्या अवधीत पार केला आहे. अल्पवयीन असुनही आपल्या क्षमतेने आरवने हे अंतर आठ तास ४० मिनिटात पार केले. गेटवे ऑफ इंडिया टप्प्यात असताना सागरी वातावरण बदलले, वाऱ्याचा वेग वाढला. लाटा उसळू लागल्या. त्यामुळे आरवला जे अंतर दोन तासात कापण्यास मिळणार होते, त्या अंतरासाठी त्याला पाच तास लागले.

Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Voters in Malabar Hill insist on environment conservation in the wake of assembly elections 2024 mumbai print news
मलबार हिलमधील मतदार पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

हेही वाचा >>> छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला म्हणून गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांवर गंभीर आरोप

मंगळवारी मध्यरात्री एक वाजून १८ मिनिटांनी आरवने धरमतर येथे समुद्रात सूर मारला. प्रशिक्षक, निरीक्षक, आई, वडील, आजी, आजोबा यांच्या साक्षीने त्याने गेटवेच्या दिशेने कूच केली. उगवत्या सूर्याच्या साक्षीने गेटवेचा टप्पा जवळ आला असतानाच सागरी वातावरण बदलले, समोरुन लाटा उसळू लागल्या त्या वातावरणात आरवला दुप्पट क्षमतेने टप्पा पार करावा लागणार हे निदर्शनास येताच प्रशिक्षकांनी आरवला या बदलाच्या वातावरणातून सोडविण्यासाठी पाच किमीचा वळसा घेऊन गेटवेच्या दिशेने कूच करण्यास सांगितले. या वळशामुळे आरवला ज्या दोन तासात गेटवेला पोहचणे सहज शक्य होते. त्या अंतरासाठी त्याला पाच तास लागले. बुधवारी सकाळी ९.५८ ला आरवने गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचला.  नातेवाईक, आप्त, शाळा प्रमुखांनी आरवचे जंगी स्वागत केले.

जलतरण प्रवास

आरव डोंबिवलीतील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी आहे. तो इयत्ता चौथी इयत्तेत शिक्षण घेतो. गोळे कुटुंबीयांमध्ये शौर्य, खेळ गुण पीढीजात आहेत. आरवचे पणजोबा बळवंत गोळे नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या पहिल्या तुकडीचे (१९२८-१९३०) विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी लष्करात भरती होऊन देशसेवा केली. निवृत्तीनंतर कोकण भागात बर्फाच्या फॅक्टरी सुरू केल्या. आरवचे आजोबा अशोक ज्युडो खेळातील निष्णांत आहेत. वडील अव्दैवत जलतरणपटू, आई राष्ट्रीय ॲथलेटिक्स पटू आहे.

हेही वाचा >>> मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने निमंत्रितांचे कवी संमेलन, ठाणे महापालिकेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

डोंबिवली जीमखाना येथे राजेश गावडे या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अर्णवचे (वय ३) जलतरण प्रशिक्षण सुरू झाले. फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, आयएम या पोहण्याच्या पध्दतीत आरव तरबेज झाला. सहा वर्षाखालील जलतरण स्पर्धांमध्ये आरव पहिल्या पाच क्रमांकात बाजी मारू लागला. राष्ट्रीय जलतरण पातळीवर पोहचण्यासाठी आरवचे मितेश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू झाले. मितेश यांनी आरवच्या क्षमता ओळखून तो दूर अंतरावरचे टप्पे सहजगत्या पार करू शकतो हे हेरून त्याप्रमाणे त्याला तरबेज केले. प्रशिक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूर अंतराचे खडतर, अभ्यासपूर्ण प्रशिक्षण आरवने पूर्ण केले. माणकेश्वर (उरण), विरार, नालासोपारा येथे समुद्री जलतरण सराव आरवने केले. संगणक अभियंता आणि आहारतज्ज्ञ ममता पटवर्धन (नवी मुंबई) यांनी आरवच्या जलतरणासाठी लागणारा आवश्यक आहार याचा समतोल राखून त्याची सुदृढता कायम राहिल याची विशेष काळजी घेतली. विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आरवला पोहण्याचे प्रशिक्षण पूर्ण करता यावे म्हणून शाळेच्या वेळेत सूट दिली. कल्याण स्पोर्टस क्लब, डोंबिवली जिमखाना येथे त्याने प्रशिक्षण पूर्ण केले. दिलीप भोईर यांचे त्यांना सहकार्य लाभले. राजेंद्र म्हात्रे आरवचा मसाज करतात.

जलतरण सज्जता

कुशल प्रशिक्षकांच्या तालमीत तयार झालेला आरव समुद्री अंतर लिलया पार करू शकतो यावर शिक्का मोर्तब झाल्यावर आवश्यक परवानग्या, नौदलाने समुद्री वातावरणाच्या दिलेल्या तारखांप्रमाणे गोळे कुटुंबीय, प्रशिक्षकांनी आरवला धरमतर ते गेटवे अंतर पार करण्यासाठी सज्ज केले. जयहिंदची सलामी देऊन आरवने समुद्रात सूर मारली. अंधाऱ्या रात्रीत प्रखर विजेऱ्यांच्या प्रकाश झोतात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने बालवयातील आपले ध्येय गाठले.

‘पणजोबांप्रमाणे मी देशसेवेसाठी भारतीय नौदलात भरती होणार आहे. जलतरण क्षेत्रात विविध विक्रम करण्याचा मानस आहे.’

-आरव गोळे, जलतरणपटू

‘आरव अतिशय नम्र, अभ्यासात हुशार आणि गुणवान मुलगा आहे. देशसेवेसाठी तो तयार होत आहे. याचे कौतुक आहे.’

-विवेक पंडित, विद्यानिकेतन शाळा