राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या वक्तव्याचा विरोध करत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना कॅमेरासमोरच सुप्रिया यांच्यासाठी अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये सत्तार यांच्या घरासमोर आंदोलनही केलं. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही या विधानाचा विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे नेत्यांनी हे वक्तव्य निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये राष्ट्रवादीने आंदोलन करुन सत्तार यांचा निषेध केला. यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी कठोर शब्दांमध्ये सत्तार यांच्यावर टीका केली. आव्हाड यांनी थेट सत्तार यांच्या धर्माचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाहा >> संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral

“सुप्रिया सुळेंच्याविरोधात नाही तर अत्यंतर गलिच्छ, नीच भाषेत त्यांनी टीका केलेली आहे. त्यांनी भिकार** हा शब्द वापरला आहे. महाराष्ट्राला कळावं म्हणून मी हे बोलतोय. यांची पातळी काय आहे. संस्कार काय आहेत. संस्कृती काय आहे. यांच्या जीभेवर महिलांबद्दल काय भाषा आहे. हे महाराष्ट्राला कळावं म्हणून मी हा शब्द उच्चारला,” असं म्हणत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

नक्की वाचा >> सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “…तर CM शिंदेंना मंत्रालयात…”; ३ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, NCP आक्रमक

“मी सत्तारांना जाणीव करुन देतो, सत्तार तुम्ही शिव्यांच्या ज्या शाळेत आहात ना त्याचे आम्ही सगळे मुख्याध्यापक आहोत. पण आमच्या तोंडातून ३५ वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही विरोधकाला अशी शिवी गेलेली नाही,” असंही आव्हाड म्हणाले. “आम्ही मुंबईच्या चाळी, गल्ल्यांमध्ये वाढलेलो आहोत. दर तिसऱ्या शब्दाला तोंडातून शिवी बाहेर पडायची. पण पवार साहेबांनी डोक्यावर हात ठेवल्यापासून तोंडातून शत्रूविरोधातही शिव्या निघत नाहीत,” असंही आव्हाड म्हणाले.

नक्की वाचा >> Abdul Sattar Abuse Supriya Sule: “…याचा अर्थ आम्ही शिव्या मुकाट्याने…”; आत्याला शिवी देणाऱ्या सत्तार यांना रोहित पवारांचा इशारा

या विधानावरुन धार्मिक संदर्भ देत आव्हाड यांनी सत्तार यांच्यावर टीका केली. “मी याहून पुढे जाऊन सांगतो. मनुवादाचा एवढा कट्टर समर्थक महाराष्ट्रात दुसरा कोणीही नाही. मनुवादाचा कट्टर समर्थक आहे अब्दुल सत्तार. कारण मनुवादामध्ये स्त्रियांना किंमतच नाही, स्थानच नाही अशी भूमिका मनूने मानली होती. तोच अब्दुल सत्तार ज्या इस्लाम धर्मातून येतो त्या इस्लाम धर्मात महिलांना काय सन्मान दिला जातो त्यांच्या तोंडूनच ऐका,” असं म्हणत आव्हाड यांनी एका मुस्लिम महिलेला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास सांगितलं. या माहिलेने इस्लाममध्ये महिलांना काय सन्मान दिला जातो याबद्दलची माहिती दिली. आमच्या धर्मात महिलांना मान दिला पाहिजे असं सांगतात. मात्र या व्यक्तीने महिलांना एवढी वाईट शिवी दिली आहे. ही शिवी फक्त त्यांनी सुप्रिया सुळेंना दिलेली नाही तर सर्व महिलांना दिलेली आहे. मला समजत नाही यांचा धर्म कोणता आहे. हे खरे मुस्लीम असते तर त्यांनी अशी शिवी दिली असती असं वाटतं नाही, असं या मुस्लीम महिलेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

नक्की वाचा >> सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंचा उल्लेख करत अमोल कोल्हे म्हणाले, “या हीन भाषेचा व नीच…”

“जसं माझ्या भगिनीने सांगितलं की तो इस्लाममधील पण नाही. जर कोणी महाभाग असतील त्याला हिंदू धर्मात प्रवेश देत असतील, गंगेवर स्थान घालून वगैरे तर आमचा नकार नाही. पण महिलेला अपमानित करणं इस्लाम धर्मात नाही,” असंही आव्हाड म्हणाले. “तो नमाज पठण करत नाही हे मला माहिती आहे. तो नेमका कोणत्या धर्माचं पालन करतो हेच मला कळत नाही,” असं आव्हाड यांनी एकेरी उल्लेख करत म्हटलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar abuse supriya sule jitnedra awhad says islam does not permit insulting women which religion he fallows is question scsg