ठाणे : आव्हाड कुटुंबियांच्या मी अत्यंत जवळ होतो. आव्हाड कुटुंबासोबत मी अगदी कुटुंबा प्रमाणे राहत होतो. त्यामुळे अनेक प्रकरणे मी अंगावर घेतली होती. आता मी मोकळा श्वास घेत आहे. व्यवस्थित झोपू शकतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट) यांचे निकटवर्तीय अभिजीत पवार यांनी दिली. अभिजीत पवार आणि हेमंत वाणी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच प्रभागात निधी आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हात हवा असतो. त्यामुळे हा प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदारा जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांनी काम केले होते. तसेच ते आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. त्याचबरोबर ठाणे शहरातील खोपट परिसरातून हेमंत वाणी आणि त्यांची पत्नी सीमा वाणी हे महापालिकेची निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. ते सुद्धा आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आव्हाड यांच्यावर टीका करणाऱ्यांना मारहाण केल्याचाही त्यांच्यावर आरोप दोघांवर होता. त्यांच्यावर यापूर्वी तडीपारीच्या कारवाया देखील झाल्या होत्या. त्यांनी महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावरही महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला होता. याप्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. विविध प्रकरणात त्यांच्याविरोधात कारवाईचा ससेमिरा सुरू होता. अखेर विधानसभा निवडणूकीनंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

आमच्या प्रभागात निधी येणे आवश्यक आहे. कामांसाठी निधी मिळत नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात महापालिकेत निधी येणार आहे. आमच्या प्रभागात विविध विकास कामांचा प्रस्ताव आहे. राजकारणात सुधारणा येण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) यांचे निकटवर्तीय अभिजीत पवार आणि हेमंत वाणी यांनी सांगितले. अभिजीत पवार आणि वाणी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आव्हाड कुटुंबियांच्या मी अत्यंत जवळ होतो. आव्हाड कुटुंबासोबत मी अगदी कुटुंबा प्रमाणे राहत होतो. त्यामुळे अनेक प्रकरणे मी अंगावर घेतली होती. आता मी मोकळा श्वास घेत आहे. व्यवस्थित झोपू शकतो. आव्हाड यांनी स्वभावामध्ये बदल करायला हवा असे अभिजीत पवार म्हणाले. प्रभागात कामे करायची आहे. नागरिकांची समस्यांतून सुटका करायची आहे. त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश केला आहे असेही ते म्हणाले. पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार असल्याचे अभिजीत पवार यांनी सांगितले. काही विकासकामे करायची असतात. त्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हात हवा असतो. त्यामुळे हा प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रभागात लोकांची कामे करण्यासाठी मी पक्ष सोडल्याचे हेमंत वाणी यांनी सांगितले.

Story img Loader