नेपाळ येथे कामानिमित्ताने गेलेल्या एका व्यवसायिकाच्या खात्यातून ऑनलाईनरित्या भामट्यांनी ९९ लाख ७९ हजार ८०० रुपये गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.ठाण्यातील रघुनाथनगर भागात ६१ वर्षीय व्यवसायिक राहत असून ते रविवारी मुलासोबत काही कामानिमित्ताने नेपाळ येथे गेले होते. ते बहुतांश व्यवहार इंटरनेट बँकिकमधून करत असतात. नेपाळ येथे गेल्यावर त्यांचा मोबाईल फोन दोन दिवस बंद होता.
हेही वाचा >>>ऐतिहासिक चित्रपटांसाठी इतिहास तज्ज्ञांची समिती गठीत करा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
याच काळात भामट्याने त्यांच्या मोबाईल क्रमांकाचे एक सिमकार्ड घेतले. त्यानंतर त्या भामट्याने टप्प्या-टप्प्याने ९९ लाख ७९ हजार ८०० रुपये विविध बँक खात्यांमध्ये वळते करून घेतले. याची माहिती व्यवसायिकाला मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.