भिवंडी येथे एका इमारतीवर अतिक्रमण विभागाची कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हातोहात पकडले आहे. रमाकांत म्हात्रे असे सफाई कामगाराचे नाव असून एसीबीने त्याला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार हे परिसरातील एका इमारतीचे देखरेखीचे काम करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच भिवंडी महापालिकेत सफाई काम करणाऱ्या रमाकांत म्हात्रे याने इमारतीवरील कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे यांसदर्भाची तक्रार दाखल केली. एसाबीने प्रकरणाची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने रमाकांत म्हात्रे याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb arrested bhiwandi municipal cleaning worker for taking bribe zws