रमेश पाटील, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाडा: मनोर-वाडा या महामार्गावर आज सकाळी साडेआठ वाजता वरले या गावानजीक कंटेनर व एसटी बस यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील १७ प्रवासी, चालक, वाहक व कंटेनर चालक व सहकारी असे एकूण २१ जण जखमी झाले आहेत.

वाड्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वरले या गावाजवळ हा अपघात झाला. आज बुधवारी (१९ एप्रिल) मनोर -वाडा या महामार्गावर वाड्याच्या दिशेने येणारी बोईसर-वाडा व वाड्याहून मनोरच्या दिशेने जाणारा कंटेनर या दोन वाहनांमध्ये हा अपघात झाला.

आणखी वाचा- श्रमिक जनता संघाचे ५७ वे राष्ट्रीय अधिवेशन ठाण्यात 

या ठिकाणी एकेरी रस्ता असून या दोन्ही वाहनांच्या मध्येच आलेल्या एका दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न करताना दोन्ही वाहनांच्या चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरासमोर टक्कर होऊन हा अपघात झाला. त्यातच सकाळी अर्धा तास झालेल्या पावसाने संपूर्ण रस्ता ओला झाला होता.

अपघातात जखमी असलेल्यांपैकी ६ प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी रुग्णालय ठाणे येथे पाठविण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident between container and bus near wada driver of container and 20 passengers injured mrj