पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील नितीन कंपनी पूलावर एक टेम्पो उलटला आहे. यामुळे नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी मुंबईत कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या चालकांचे, प्रवाशांचे झाले असून पाच मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागत आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा सकाळी ९ वाजता नितीन कंपनी पूलावर अपघात झाला. या अपघातग्रस्त ट्रकमुळे नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या एकामागे एक रांगा लागल्या आहेत. नागरिकांनी कोंडी टाळण्यासाठी काहीकाळ अंतर्गत मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader