ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात बुधवारी सायंकाळी कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक कमलेश कुमार (२७) जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. चालकाने रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या अपघातामुळे कॅडबरी परिसरात वाहतुक कोंडी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई न्हावा शेवा येथून गुजरातच्या दिशेने कंटेनर वाहतुक करत होता. हा कंटेनर बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कंटेनर कॅडबरी जंक्शन उड्डाणपूलाजवळ आला. त्यावेळी कंटेनर चालक कमलेश याचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर उलटला. या अपघातात कमलेश यांच्या दोन्ही पायाला आणि पाठीला किरकोळ दुखापत झाली. त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन परिसरात काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. या कंटेनरला रस्त्यावरून बाजूला करण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरू होते

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on eastern expressway thane news amy
Show comments