लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: घोडबंदर येथील पातलीपाडा भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. माजीद खान (४०) असे मृताचे नाव आहे. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावरील मुख्य मार्गावरील वाहतूक दोन तास बंद होती. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने येथील कंटेनर रस्त्याच्या बाजूला केले. त्यांनतर वाहतूक सुरळीत झाली.
राजस्थान येथून माजीद हा घोडबंदर मार्गाने कंटेनरमधून १० टन वजनाचे कापड नवी मुंबईच्या दिशेने घेऊन जात होता. कंटेनर पातलीपाडा येथे आला असता, माजीदचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर समोर असलेल्या एका कंटेनरला धडकला. या धडकेत माजीदचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेला.
आणखी वाचा-VIDEO : सतर्क तिकीट तपासनीसामुळे वाचले महिलेचे प्राण; अंबरनाथ स्थानकातील घटना
या अपघातामुळे घोडबंदर मार्गाची मुख्य मार्गिका दोन तास बंद होती. येथील वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी झाली होती. पथकाने क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला केले. त्यांनतर येथील वाहतूक सुरळीत झाली.