मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवासी जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकी काय घडली घटना?
आज १८ जुलैच्या सकाळी ६:३० च्या सुमारास मौजे पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर MH 48 T 7532 व काळी पिवळी जीप MH04E 1771 (विद्यार्थी असलेली) पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.
अपघाती मृत्यू झालेल्यांची नावं
१) चिन्मयी विकास शिंदे (वय १५)
२) रिया किशोर परदेशी
३) चैताली सुशांत पिंपळे (वय २७)
४)संतोष अनंत जाधव (वय ५०)
५)वसंत धर्मा जाधव (वय ५०)
६) प्रज्वल शंकर फिरके
तीन प्रवासी जखमी
१)दिलीप कुमार विश्वकर्मा (वय २९)
२)चेतना गणेश जसे (वय १९)
३) कुणाल ज्ञानेश्वर भामरे (वय २२)
अनेक वर्षांपासून या भागात उड्डाण पुलाची मागणी केली जाते आहे. तीन वेळा ग्रामस्थांनी आंदोलन करुन टोलनाकाही बंद केला होता. मात्र प्रशासनाकडून उड्डाण पूल बांधण्यासाठी काहीही हालचाली केल्या गेल्या नाहीत. आज झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं.