लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : येथील कॅडबरी सिग्नल जवळ, नाशिक-मुंबई महामार्गावरून सिन्नरहून मुंबईकडे जात असलेल्या सिमेंट मिक्सर टँकरची ट्रकला जोरदार धडक बसून अपघात झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
आणखी वाचा-कल्याण बालिका हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम सरकारी वकील
संदिप यादव हे रविवारी नाशिक – मुंबई महामार्गावरुन सिन्नर हून मुंबईच्या दिशेकडे प्रवास करत असताना, त्यांचा मिक्सर टँकर कॅडबरी सिग्नलजवळ येताच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला. त्याचवेळी मुकेश यादव (३०) आणि त्याचा मदतनीस पंकज (२५) हे दोघे मिक्सर टँकर घेऊन ओवळा माजिवडा हून मुलुंडकडे प्रवास करत होते. कॅडबरी सिग्नलजवळ येताच मुकेश याचा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याची धडक बंदावस्थेत उभ्या असलेल्या मिक्सत टँकरला बसली. या अपघातात मुकेश यादव (३०) आणि पंकज (२५) हे दोघे गंभिररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.