लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली पूर्व, पश्चिम भाग जोडणारा सर्वाधिक वर्दळीचा कोपर आणि ठाकुर्ली उड्डाण पुलावर खड्डे पडले आहेत. या पुलाच्या उतार भागात खड्डे असल्याने वाहने जोरात या खड्ड्यात आपटत आहेत. या खड्डयांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने पालिकेने तात्काळ दोन्ही पुलांवरील खड्डे बुजविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले

कोपर पुलाच्या पश्चिम दिशेला उतार भागात दोन ते तीन मोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालक हे खड्डे चुकवत असताना अपघात होण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांच्या समोरील भागात शाळा आहे. सकाळ, दुपार पालक याठिकाणी वाहने घेऊन येतात. एखादे भरधाव वेगात असलेले दुचाकी वाहन या खड्ड्यात आपटून चालक वेगाने सरपट जाण्याची भीती येथे आहे. पुलाच्या मध्यभागी काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे वेळीच बुजविले नाहीत तर त्यांचा आकार मोठा होईल, अशी शक्यता वाहन चालक व्यक्त करतात.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना, उद्वाहक बंद राहत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

ठाकुर्ली पुलाच्या स. वा. जोशी शाळेकडील दिशेला उतार भागात खड्डे पडले आहेत. याठिकाणी भुयारी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावर येते. हे पाणी खड्ड्यात जाते. अनेक वेळा पाण्याने भरलेला खड्डा आहे की नाही हे दिसून येत नाही. या ठिकाणी रस्तारोधक लावून ठेवण्यात आले आहेत. वाहन चालकांना याठिकाणी वळण घेताना त्रास होतो.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस, लहान मोटारी याच पुलावरुन येजा करतात. अनेक पालक दुचाकीवरुन मुलांना शाळेत पोहचवतात. एखादे वाहन चुकून खड्ड्यात आपटले तर शालेय वाहनाला अपघात होण्याची शक्यता आहे. पालिका अधिकारी नियमित या रस्त्यावरुन येजा करतात. तेही याविषयी गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. पालिकेकडून खड्डे भरणीची कामे जोरात सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी पावसाने उघडीप देऊन अनेक ठिकाणचे खड्डे बुजविले गेले नाहीत, अशा तक्रारी आहेत.