ठाणे: पाचपाखाडी येथे एका जखमी भटक्या श्वानावर उपचार सुरू असतानाच तिच्या समोरच पिलाचा कार अंगावरून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाचपाखाडी येथील सिद्धेश्वर तलाव परिसरात एक भटक्या श्वानास जखम झाल्याची माहिती एका प्राणी मित्र संघटनेला मिळाली होती. त्यामुळे संस्थेचे स्वयंसेवक त्याठिकाणी रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले. त्याठिकाणी त्या श्वानाची तीन पिल्ली तिच्या भोवती होती.
हेही वाचा >>>“गुंडांकडून आमच्यावर हल्ले करता, हेच तुमचं हिंदुत्व”, शिवसेनेचा शिंदे गटाला सवाल; म्हणाले, “अंगावर यायचे तर…”
श्वानावर स्वयंसेवक प्राथमिक उपचार करत असताना एक पिलू हे जवळील असलेल्या गतीरोधकाजवळ बसले होते. त्याचवेळी एक कारचे चाक त्याच्या डोक्यावरून गेली. स्वयंसेवकांनी त्या पिलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी स्वयंसेवकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.