कल्याण: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर याच भागातील दोन जणांनी कट करून लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणातील एक आरोपी सुमीत संजय लोथ याला संगमेश्वर पोलिसांनी अटक केली होती. जानेवारीमध्ये हा गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या एका आरोपीला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील उंबार्ली गावातील एका चाळीतून बुधवारी अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेम एकनाथ शिंदे (२१) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा संगमेश्वर तालुक्यातील रहिवासी आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तो फरार झाला होता. तेथून तो डोंबिवली जवळील उंबार्ली गावातील मंदाधाम चाळीत लपून राहत होता. या लैंगिक अत्याचार प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा… कल्याण-डोंबिवली पालिकेतील दहा अधिकारी चौकशी रडारवर

संगमेश्वर तालुक्यात लैंगिक अत्याचार करून तेथून पळून आलेला एक आरोपी डोंबिवली जवळील उंबार्ली गावातील एका चाळीत राहत आहे, अशी माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेतील हवालदार सचीन वानखेडे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना दिली. मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठ निरीक्षक पवार, उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार सचीन वानखेडे यांच्या पथकाने बुधवारी उंबार्ली गावात सापळा लावून प्रेम शिंदे याला अटक केली. त्याने संगमेश्वर तालुक्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहभागाची कबुली पोलिसांना दिली. त्याचा ताबा संगमेश्वर पोलिसांना देण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused from ratnagiri who raped a minor girl arrested in dombivli dvr