ठाणे : प्रेयसीला मोटारीची धडक देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणात आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडितेने करूनही पोलिसांनी ती मान्य केलेली नाही. यामुळे या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा चालू आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान

हेही वाचा >>> दुर्बलांचा उत्कर्ष हेच बँकांचे अधिष्ठान – सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

घोडबंदर येथील वाघबीळ भागात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने अश्वजित गायकवाड यांच्याशी गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. ११ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता अश्वजीत याने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ आपल्याला भेटण्यास बोलावले. तेथे आमच्यात वाद झाल्यानंतर त्याने मारहाण करत मोटारीने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडितेने केला होता.

तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजीत याच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात दुखापत करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे हत्येचा प्रयत्न करणे, धमकावणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मी सांगितलेला घटनाक्रम पोलिसांत दाखल गुन्ह्यात नमूद केलेला नाही. त्यामुळे मला पुन्हा माझा जबाब नोंदवायचा आहे. या प्रकरणात ३०७ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  पीडित तरुणीने केली होती.

‘३०७ नुसार गुन्हा दाखल करा’  पीडित तरुणीच्या वकील दर्शना पवार यांनी पत्रकारांना सांगितले की, हे प्रकरण गंभीर असून आरोपींवर ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. परंतु पोलिसांनी या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान, याप्रकरणात एक बडा उद्योगपती हस्तक्षेप करत असल्याचीही चर्चा चालू आहे.

Story img Loader