कल्याण – महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सातत्याने सुरू आहे. जून महिन्यात टिटवाळा उपविभागातील मांडा, गावेली, कोन आणि खडावली शाखा कार्यालयांतर्गत १४७ वीज ग्राहकांवर धडक कारवाई करून ५९ लाख २४ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा टाळणाऱ्या ६० जणांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली टिटवाळा उपविभागात वीजचोरी शोध मोहीम नियमितपणे सुरू आहे. या मोहिमेत मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत ५० जणांकडे १८ लाख ५३ हजार ५१० रुपये, कोनगाव शाखा परिसरातील ४३ जणांकडे २८ लाख ७८ हजार १६० रुपये, गोवेली शाखा कार्यालयाच्या अंतर्गत २८ जणांकडे ९ लाख ५१ हजार ५३० रुपये आणि खडावली शाखा परिसरातील २६ जणांकडे २ लाख ४० हजार ८८० रुपयांची वीजचोरी आढळून आली.

VIDEO: तेल गेले, तूपही गेले..! चोरट्यांनी एटीएमला चक्क दोरीने बांधून…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MCOCA Act should be implemented against chain thieves
शहरबात : साखळी चोरट्यांना ‘मकोका’ लावाच
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : नळजोड तोडणीबाबतचे ‘एसएमएस’ फसवणुकीचे; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन
maharashtra lost over rs 1085 crore to cyber scams in last three month
तीन महिन्यांत १०८५ कोटींची सायबर फसवणूक
Transport e-challans worth Rs 2500 crore pending across the state
दंडात्मक कारवाईला ‘खो’; राज्यभरात अडीच हजार कोटींवर वाहतूक ई-चालान प्रलंबित
Police team arrests thief who tried to steal mobile phone at Thane railway station thane news
ठाणे रेल्वे स्थानकात ८० हजार रुपयांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; चोरट्याला पोलीस पथकाने केली अटक

हेही वाचा – पडघा ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराविरुद्ध ग्रामस्थांचे साखळी उपोषण, शासकीय जमिनींवरील बेकायदा बांधकामांना अभय

हेही वाचा – मुरबाडमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा फलक

या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली. परंतु विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा टाळणाऱ्या ६० जणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादनुसार मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंते तुकाराम घोडविंदे व अभिषेक कुमार, कनिष्ठ अभियंते अलंकार म्हात्रे आणि सचिन पवार यांच्या चमूने ही कामगिरी केली. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे कोणतीही युक्ती वापरून वीजचोरी करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Story img Loader