लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: डोंबिवली, कल्याण कोळसेवाडी वाहतूक विभागातर्फे गेल्या दोन दिवसात ठाणे वाहतूक विभाग उपायुक्तांच्या आदेशावरुन अचानक रस्ते, चौकांमध्ये वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. एक तासाच्या अवधीत शहरातील, मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत डोंबिवली, कोळसेवाडी वाहतूक विभागाने ५८२ वाहन चालकांवर कारवाई केली. या वाहन चालकांकडून पाच लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी कल्याण, डोंबिवलीतील वाहतूक प्रमुखांना शहराच्या विविध भागात जाऊन अचानक वाहन तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. तपासणी मोहिमेत वाहतूक शाखेत पोलीस अधिकारी, हवालदार, वाहतूक सेवक यांना सहभागी करुन घेण्याचे सूचित करण्यात आले होते.

हेही वाचा… पथदिव्यांच्या जिवंत वीज वाहिनीमुळे डोंबिवलीत रहिवाशाचा मृत्यू

या आदेशाप्रमाणे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा, काटई चौक, लोढा अंतर्गत रस्ता, बदलापूर चौक या भागात २५ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन गुरुवारी अचानक तपासणी मोहीम राबवली. एक तासाच्या अवधीत तपासणी पथकाने मोटार कार चालक, दुचाकी स्वार, अवजड, जड वाहन अशा एकूण ३६७ वाहन चालकांवर कारवाई केली.

हेही वाचा… इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन’; अल्पवयीन मुलीला धमकी, दोन तरुण अटकेत

शिरस्त्राण न घालता दुचाकी चालविणे, दुचाकी चालविताना मोबाईलवर संभाषण, गणवेश न घालता रिक्षा चालविणे, वाहनाची कागदपत्र सोबत न ठेवता वाहन चालविणे, वाहतूक दर्शक न पाळता वाहन पुढे नेणे, काळ्या काचा लावून वाहन चालविणे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक तासाच्या अवधीत चार लाख १५ हजाराचा दंड मोटार वाहन कायद्याने वसूल करण्यात आला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा… ठाणे : मयुर शिंदे याच्या अटकेनंतर ठाण्यातील राजकारण तापले

डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी २६ कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने बुधवारी एक तासाच्या अवधीत डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या टिळक चौक रस्त्यावर वाहन तपासणी मोहीम राबविली. वाहतुकीचे नियम न पाळता वाहन चालविणाऱ्या २१५ चालकांवर यावेळी कारवाई करण्यात आली. यामध्ये मोटार, दुचाकी, रिक्षा चालक, अवजड वाहन चालक यांचा समावेश होता, असे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी सांगितले. या चालकांकडून एकूण एक लाख ६२ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. घटनास्थळी २३ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. काही दंड ई चलान माध्यमातून वसूल केला जात आहे, असे गित्ते यांनी सांगितले.

“वरिष्ठांच्या आदेशावरुन वाहतूक विभाग हद्दीत अचानक वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. घटनास्थळीच कसूरदार चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम नियमित राबविण्यात येणार आहे.” – रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी, कल्याण.