एक दिवसाचे वेतन कापले, तर काहींचे निलंबन
अंबरनाथ नगरपालिकेत कामावर न येता दांडय़ा मारणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला असून पालिकेत कायम असलेल्या एकूण ५८४ सफाई कर्मचाऱ्यांपैकी ९६ कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मुख्याधिकाऱ्यांनी यासाठी शुक्रवारी सकाळी सात वाजताच या कर्मचाऱ्यांच्या हजेरीची वही तपासली असता हे कर्मचारी कामावर न आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून शहरातील नागरिक याबद्दल नाराजीही व्यक्त करत आहेत, मात्र ही धक्कादायक बाब समोर आली असून पालिकेत कायम नोकरीला असलेल्या काही सफाई कर्मचाऱ्यांनी सफाईकडे दुर्लक्ष करत थेट दांडी मारण्यात समाधान मानले आहे. अंबरनाथ शहरातील सफाईचा प्रश्न गंभीर झाला असतानाच
इतके दिवस दफ्तरदिरंगाईत समाधान मानणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती, मात्र ही बाब मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्या लक्षात येताच त्यांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजता शहराच्या सहा विभागांतील सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली. त्यात त्यांना हे कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी होणार कारवाई
पालिकेत कायम असलेल्या एकूण ५८४ पैकी ९६ सफाई कर्मचारी गैरहजर होते. त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात येणार आहे. यापैकी १२ कर्मचारी हे सतत गैरहजर असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, तर ३० कर्मचारी हे आजारी अथवा व्याधिग्रस्त असल्याने त्यांना तपासणीसाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात येणार असून त्याचा अहवाल पाहून त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत शुक्रवारी सकाळी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक तपासले असता, त्यात काही कर्मचारी गैरहजर आढळून आले आहेत. संपूर्ण माहिती घेत त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. पालिकेत यापुढे दफ्तरदिरंगाई कधीच खपवून घेतली जाणार नाही.
गणेश देशमुख,
मुख्याधिकारी, अंबरनाथ नगर परिषद