डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली पुला जवळील बावनचाळ भागात रेल्वेची प्रशस्त पडिक जमीन आहे. या जागेवर रेल्वेची कोणतीही परवानगी न घेता वाहनतळ समजून तेथे रुग्णवाहिका मालकाकडून रुग्णवाहिका नियमित नियमबाह्य उभ्या केल्या जात होत्या. या पाच रुग्णवाहिका डोंबिवली रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी रेल्वे कायद्याने कारवाई करत जप्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात डोंबिवली शहरातील रुग्णांना तत्पर सेवा उपलब्ध व्हावी म्हणून ठाकुर्ली पुलाजवळील बावनचाळ भागातील रेल्वेच्या प्रशस्त जागेत दोन वर्षापासून डोंबिवलीतील देवा रुग्णवाहिका सेवेचे पुरवठादार रुग्णवाहिका उभे करत होते. रुग्ण, शहराची गरज ओळखून रेल्वेने कधी या रुग्णवाहिकांना हरकत घेतली नव्हती. गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेच्या वरिष्ठांनी बावनचाळ भागात भेट दिली होती. त्यावेळी त्यांना रेल्वेच्या जागेवर अनधिकृत वाहनतळ सुरू असल्याचे आणि त्यावर नियमबाह्य रुग्णवाहिका उभ्या करण्यात येत असल्याच्या निदर्शनास आले होते. त्यांनी यासंदर्भात कारवाईच्या सूचना केल्या होत्या असे समजते.

रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी बावन चाळीतील वाहनतळावर बेकायदा उभ्या करून ठेवण्यात आलेल्या पाच रुग्णवाहिका जप्त केल्या. बावनचाळीतील जागा रेल्वेची आहे. तेथे वाहनतळ नाही. त्या ठिकाणी नियमबाह्य रुग्णवाहिका ठेवण्यात येत असल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत, असे रेल्वे सुरक्षा बळाच्या महिला अधिकारी यादव यांनी सांगितले.

रुग्णवाहिका डोंबिवली पश्चिमेत रस्त्यावर रुग्णवाहिका उभ्या करत होतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत होता. त्यामुळे रेल्वेच्या बावनचाळ भागात मोकळी जागा असल्याने तेथे रुग्णवाहिका उभ्या करून ठेवत होतो. रुग्ण सेवेसाठी वाहन तात्काळ उपलब्ध होत होते. करोना काळात याच जागेवरून रुग्णांना सेवा दिली. आपण या जागेवर रुग्णवाहिका उभे करतो हे रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती होते. आता रेल्वेने कायद्याची अंमलबजावणी करत रुग्णवाहिका जप्तीची कारवाई केल्याने आश्चर्य वाटले. कायदा सर्वांना समान आहे. आमच्याकडून नियमांचे उल्लंघन झाले असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. रेल्वे सुरक्षा बळाने कारवाई करण्यापूर्वी कळवले असते तर या रुग्णवाहिका तेथून काढून दुसऱ्या ठिकाणी नेल्या असत्या, असे देवा रुग्णवाहिका सेवेचे भालचंद्र पवार यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action by railway security force seized the ambulance parked in the railway premises at bawanchal in dombivli amy
Show comments