ठाणे – शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसांत विविध भागातील अशा प्रकारच्या १ हजार १२२ वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांचा प्रवास हा सुरळीत आणि कोंडीमूक्त व्हावा यासाठी ९ डिसेंबरपासून ठाणे वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे शहरातील सेवा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या आहे. पार्किंगसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होत नाही, तसेच अनेकजण पार्किंगचे शुल्क भरावे लागू नये म्हणून सेवा रस्ता तसेच शहरातील अंतर्गत मार्गावर बेकायदेशिररित्या वाहने उभी करतात, असे चित्र दिसून येते. या वाहनांमुळे वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांनाही अडथळा निर्माण होत असतो. आधिच रस्ते अरुंद त्यात वाहनांची पार्किंग यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. सेवा रस्त्यावर होणारी ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ९ डिसेंबरपासून या मोहिमेस सुरवात झाली आहे. या मोहिमेमध्ये शहरातील विविध भागांतील सेवा रस्त्यांवर बेकायदेशिररित्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, कापूरबावडी, कासारडवली आणि राबोडी या भागात ९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत १ हजार १२२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई कापुरवाबडी भागात करण्यात आली आहे. कापूरबावडी भागात ३८० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेकडून प्राप्त झालेल्या अहवालात देण्यात आली आहे.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
deportation action against criminals is on paper only
पुणे : तडीपारीची कारवाई कागदावरच; तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे शहरात वावर
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
Accidents increase Maharashtra ranking third in road accident victims
रस्ते अपघातांतील बळींमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

हेही वाचा – ठाण्यात १२४७ दुकाने मराठी पाटीविना, ठाणे महापालिकेच्या सर्वेक्षणात माहिती उघड

महामार्गावरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी सेवा रस्त्यांचा पर्याय निवडला जातो. सेवा रस्ते हे महामार्गाला जोडलेले असतात. परंतू, सेवा रस्त्याच्या दुतर्फा मार्गावर नागरिकांकडून बेकायदा वाहने उभी केली जातात. सेवा रस्त्याची जी बाजू महामार्गाशी जोडलेली आहे, त्या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे. परंतु, ज्या ठिकाणी वस्ती आहे, त्या बाजूला पार्किंगसाठी जागा असल्यास वाहने उभी करु शकतात. त्यामुळे महामार्गाला जोडून असलेल्या सेवा रस्त्यावरील वाहनांवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

महामार्गांवरही बेकायदेशीर वाहनांवर कारवाई

घोडबंदर तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर काही ठिकाणी बेकायदेशिररित्या ट्रक, बस उभ्या केल्या जातात. यामुळे अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. यासंदर्भातील तक्रार वाहतूक नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होताच, या वाहनांवरही कारवाई केली जात आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

हेही वाचा – ठाणे : शाळा, महाविद्यालयांमध्ये महोत्सवाची धूम, विद्यार्थी-शिक्षक आयोजनात व्यस्त

सेवा रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत आणि कोंडीमुक्त व्हावी यासाठी त्याठिकाणी उभ्या असलेल्या बेकायदेशिर वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु केली आहे. यामध्ये वाहन चालकांवर नो पार्किंगच्या केसेस लावण्यात येत आहेत. – डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

सेवा रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांवर केलेली कारवाई (९ डिसेंबर ते १४ डिसेंबर)

विभाग कारवाई

कोपरी १०८

नौपाडा १९४

वागळे १०३

कापुरबावडी ३८०

कासारवडवली २४६

राबोडी ९१

एकूण ११२२

Story img Loader