ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डाॅ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई शनिवारी करण्यात आली. रुग्णालयातील डाॅक्टरांच्या वसतीगृहाच्या दुरावस्थेस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने ही कारवाई केली.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभाग तयार करण्यात आला असून त्याचबरोबर रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय उभारण्यात आलेले आहे. या प्रकल्पांचे शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील डाॅक्टरांच्या वसतीगृहाच्या दुरावस्था असल्याची बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आली होती. याशिवाय, तेथील महिला डाॅक्टरांनी या दुरावस्थेसह त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या तक्रारी करताच मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये डाॅक्टर चांगले काम करीत आहेत. पण, रुग्णांना सेवा देणाऱ्या डाॅक्टरांच्या वसतीगृहाची परिस्थिती चांगली नाही. यासाठी जे जबाबदार अधिकारी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले. या आदेशानंतर आयुक्त बांगर यांनी तातडीने महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डाॅ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणालाही पदभार देण्यात आलेला नाही. या वृत्तास आयुक्त बांगर यांनी दुजोरा दिला आहे.

health system, CM Eknath Shinde,
आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निवासी डॉक्टरांच्या सुविधांसाठी निधी देणार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
pune liquor ban ganeshotsav marathi news
मद्यविक्रीबंदीने गुन्हे कमी होणार का? मद्य विक्रेत्यांचा सवाल; पुढील वर्षी जिल्ह्यात बंदीची गणेश मंडळांची मागणी
Ajit Pawar private secretary, Supriya Sule,
बारामतीत शासकीय कार्यक्रमात अजित पवारांंचा खासगी सचिव व्यासपीठावर?; राजशिष्टाचारात बदल केले का? सुप्रिया सुळेंचा सवाल
Case against former Shiv Sena corporator Mohan Ugle in Kalyan
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा
Movement of Mahavikas Aghadi in case of Chhatrapati Shivaji Maharaj statue accident
‘जोडे मारा’वरून जुंपली! पुतळा दुर्घटनाप्रकरणी मविआचे आंदोलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र
Opposition leader Vijay Wadettiwar criticism of the Sanjay Rathod plot case Nagpur news
मतांसाठी लाडक्या बहिणीला १५०० रुपये आणि लाडक्या मंत्र्याला ५०० कोटींचा भूखंड; संजय राठोड भूखंड प्रकरण