ठाणे : ठाणे परिसरातील घोडबंदर रोड वरील कासारवडवली या ठिकाणी बिकानेर स्वीट्स हे प्रचलित असे मिठाईचे दुकान आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांमार्फत बुधवारी या दुकानाची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी या दुकानामध्ये विनापरवाना विविध प्रकारच्या मिठाई व फरसाण असे पदार्थाचे उत्पादन करीत असल्याने आढळून आले. अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे उल्लंघन केल्याबद्दल त्रुटीची पूर्तता करेपर्यंत बिकानेर स्वीट्स या दुकानास व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेे. अशी माहिती अन्न विभागाचे उपायुक्त  व्यं. व. वेदपाठक यांनी दिली आहे.

 अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत वेळोवेळी कार्यवाही करण्यात येते. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या अध्क्षतेखालील कोंकण विभागाची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना धाडसत्र राबवून अशा पद्धतीच्या कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील कासारवडवली येथील बिकानेर स्वीटस या नावे मिठाई दुकान आहे.

Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
kalyan loksatta news
कल्याण : रस्त्यावरील किराणा सामान हटविण्यास सांगितले म्हणून दुकानदाराची मारहाण
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
Bombay High Court ordered closure of 102 spinning factories over Khair smuggling
रत्नागिरी जिल्ह्यातील काताचे अवैध कारखाने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश
survey licenses for qualified hawkers are stalled
पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले

हेही वाचा >>> आव्हाड यांनी मारहाण केल्यानंतर चर्चेत आलेले अनंत करमुसे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा

या दुकानातील पदार्थांची बुधवारी तपासणी करण्यात आली. त्यावेळी अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याबाबतचा अभिलेख सादर केला नाही. तसेच या ठिकाणी अन्न पदार्थ हाताळणारे कामगार संसर्गजन्य, त्वचारोग आणि किंवा इतर रोग यापासून मुक्त आहेत किंवा कसे याबाबत खात्री व खातरजमा होण्यासाठी प्राधिकृत वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नसल्याची माहिती यावेळी समोर आली. 

हेही वाचा >>> मोटारमनच्या डब्यात प्रवेश करून लोकल अडविणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

“उत्पादन” प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीची “पर्यवेक्षक” म्हणून नेमणूक केलेली नसल्याचे ही यावेळी निदर्शनास आले. तसेच या ठिकाणी एकही  प्रशिक्षण झालेला सुपरवायझर नसल्याचे आढळून आले. तसेच अन्नपदार्थाची खरेदी बिले सादर केली नाही. त्याच बरोबर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या जनहित व जनआरोग्यासह अन्न सुरक्षेची खातरजमा होण्यासाठी मिठाई उत्पादकाने त्याच्या आऊटलेटमध्ये पाकीट बंद न केलेल्या, सुट्ट्या किंवा खुल्या स्वरुपात विक्री करण्यासाठी ठेवलेल्या मिठाईच्या कंटेनर किंवा ट्रे वर त्या अन्नपदार्थाचा, मिठाई वापरण्याची अंतिम तारीख नमूद करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा >>> दिव्यात पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक; महापालिकेच्या निषेधार्थ मडके फोडो आंदोलनाचा इशारा

मात्र, बिकानेर मिठाईच्या दुकानामध्ये विक्री करण्यासाठी ठेवलेल्या मिठाईच्या कंटेनर किंवा ट्रे वर मिठाईचा वापरण्याची अंतिम तारीख अर्थात बाबतचा तपशीलही नसल्याचे तपासणीवेळी आढळून आले. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने दुकानावर कारवाई केली. तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ अंतर्गत सदर आस्थापनेस विनापरवाना उत्पादन करीत असल्यामुळे, उत्पादन या व्यवसायासाठी परवाना घेण्यासह तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटीची पूर्तता करेपर्यत बिकानेर स्वीट्स यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश विभागातर्फे देण्यात आले आहे.

Story img Loader