कल्याण : कल्याण पश्चिम येथील उंबर्डे भागातील मुथा महाविद्यालयासमोरील खेळाच्या मैदानावर भूमाफियांनी बेकायदा बांधकामे केली होती. यासंदर्भाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या ब प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बांधकामे जमीनदोस्त केली. उंबर्डे भागात खेळाच्या मैदानावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याची माहिती ब प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना मिळाली होती. या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर बांधकामे सुरू असल्याची खात्री पटल्यावर सावंत यांनी आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरून संबंधित बांधकामे जमीनदोस्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरक्षित भूखंडांवरील बेकायदा बांधकामवर कारवाई झाल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. कल्याण पूर्व आडीवली ढोकळी भागात अनंता पाटील चौकात भूमाफियांनी बेकायदा चाळीची बांधकामे सुरू केली होती. ही सर्व बांधकामे आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबईकर यांनी आयुक्तांच्या आदेशावरून जमीनदोस्त केली. कल्याण पूर्व जे प्रभागात नेतिवली टेकडी परिसरात गोदामे उभारण्याची कामे सुरू होती. सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी तोडकाम पथकाच्या साह्याने भुईसपाट केली.