कल्याण-  महावितरणच्या टिटवाळा उप विभागातील बल्याणी आणि कोन (ता.भिवंडी) परिसरात वीजचोरी करणाऱ्या २३ जणांव कारवाई करण्यात आली. या कारवाईत १८ लाख ५० हजार रुपये किंमतीची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार बल्याणी येथील १७ जणांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात तर कोन येथील ६ जणांविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अरमान अली सलीम इदरसी, समीर खान, जयनुल अबदीन जहीर खान, जुनेद ईकबाल रईस, अलम इब्राहीम रईस, ताहीर खान नामीन, शिवाजी गायकर, युसूफ शेख, सोहेल जनेउद्दिन पाकुरडे, अन्सारी शकील अब्दुल गणी, मीना राजेश गुप्ता, शराफत ईकबाल रईस, गयुसिया वाहीद रईस, साधना अनिलकुमार पांडे, सोहेल बालमिंया रईस, असलम गुलामअली गुजर, अलमास हसरत सरगावकर (सर्व राहणार बल्याणी, टिटवाळा, ता. कल्याण) यांच्याविरुद्ध १५ लाख रुपयांच्या वीज चोरीप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात तर सतीश रामदास जोशी, मारुती सर्म्या मढवी, यशवंत बाबू नागवेकर, राजेश नानू मुकादम, अक्षय सुभाष पाटील, आतिष गुरुनाथ पाटील (सर्व राहणार कोन) यांच्याविरुद्ध साडेतीन लाखांच्या वीज चोरीप्रकरणी भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर केल्याचे आढळून आले. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंते नीलेश महाजन, अभिषेक कुमार यांच्या पथकाने कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.