लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : नववर्षाचा आनंद साजरा करत असताना कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात मोकळ्या जागांवर मद्य, अंमली पदार्थ सेवन करणारे, ढाब्यामध्ये मद्य विक्रीची परवानगी नसताना मद्य विक्री करून ग्राहकांची गर्दी जमवणे, सार्वजनिक रस्त्यांवर झाडांचा आडोसा घेऊन मद्य सेवनासाठी रात्री उशिरापर्यंत बसणे, अशा सुमारे १७० तळीरामांवर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून स्थानिक पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई केली आहे.

Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
rasta roko kudalwadi marathi news
पिंपरी : अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईला विरोध; कुदळवाडीतील व्यावसायिकांकडून रस्ता बंद
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
pune police action against vendors selling tobacco products near schools and colleges
शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या जमीनदोस्त, हडपसर भागात पोलिसांची कारवाई
Pune, Crime, Cop-24 , Police Patrol,
पुणे : रस्त्यांवरील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘कॉप – २४’, पोलिसांकडून आता अहोरात्र गस्त; ७२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
Navi Mumbai Police will open four new stations in six months due to airport expansion
नवी मुंबई पोलिसांना विस्ताराचे वेध, शहरात आणखी चार पोलीस ठाण्यांची वाढ
Major action against sand smugglers Revenue Department destroys 15 boats
बुलढाणा : वाळू तस्करांविरोधात मोठी कारवाई, महसूल विभागाने १५ बोटी केल्या उद्ध्वस्त

नवर्षाचा आनंद कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, शांततेत घेण्याचे आवाहन पोलिसांनी करूनही कल्याण, डोंबिवली शहरातील अनेक युवा, ज्येष्ठ मद्य सेवन करून सार्वजनिक रस्त्यावर धिंगाणा घालत असल्याचे गस्तीवरील पथकांना आढळले. काही ठिकाणी चाळी, इमारतींचा आडोसा घेऊन गांजा सदृश्य अंमली पदार्थ सेवन करत असल्याचे आढळले. अनेक जण डोंबिवलीतील ठाकुर्ली ९० फुटी रस्ता, कल्याण पूर्वेतील १०० फुटी रस्ता भागात उघड्यावर मद्य सेवन करत असताना पोलिसांनी पकडले.

आणखी वाचा-डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

शनिवारी रात्रभर पोलिसांनी कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात ही धरपकड मोहीम राबवली. कल्याणमध्ये एका चहा विक्रीचा नामफलक असलेल्या दुकानाला पडदे लावून तेथे मद्य विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले. मागील काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये वाढते लैंगिक अत्याचार, हल्ले, मारहाणीच्या घटना घडत आहेत. या घटनांच्या मुळाशी मद्यधुंद स्थिती, अंमली पदार्थ सेवन या गोष्टी कारणीभूत असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. या मुळावर घाव घालण्यासाठी पोलिसांनी ही धरपकड मोहीम सुरू केली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत करताना अनेकांकडून सार्वजनिक ठिकाणी नियमबाह्य कृती घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस ठाणे कारवाई

कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाणे १५ जणांवर कारवाई, बाजारपेठ पोलीस ठाणे १६, कोळसेवाडी पोलीस ठाणे ३५, खडकपाडा पोलीस ठाणे ८, डोंंबिवली मानपाडा पोलीस ठाणे ५०, रामनगर पोलीस ठाणे २५, विष्णुनगर पोलीस ठाणे १०.

आणखी वाचा-शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन

नववर्षाचा आनंद प्रत्येकाने उत्साहाने, जल्लोष करून घ्यावा, ही कृती करताना सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास होणार नाही. शांततेचा भंग होणार नाही अशी कृती अपेक्षित आहे. शहराच्या विविध भागात गैरपध्दतीने हा आनंद घेतला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्रीच्या वेळेत सार्वजनिक ठिकाणी मद्य, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. -अतुल झेंडे, उपायुक्त, कल्याण.

डोंबिवलीतील उल्हास खाडीकिनारा, माणकोली उड्डाण पुलावर रात्री उशिरापर्यंत मद्य, अंमली पदार्थ सेवन करणारे तळ ठोकून बसतात. पोलिसांनी या भागातील गस्त वाढवून संबंधितांवर कारवाई करावी. -दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक.

Story img Loader