कल्याण : गर्दीच्या वेळेत दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २७६ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बळाच्या विशेष पथकाने बुधवारी कारवाई केली. ठाणे ते बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २७६ प्रवाशांना रेल्वे सुरक्षा जवानांनी ताब्यात घेतले. लोकल मधील दिव्यांगांच्या डब्यातून सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत अनेक सुदृढ प्रवासी प्रवास करत असल्याच्या तक्रारी दिव्यांगांकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे प्रवासी दिव्यांगांच्या डब्यात चढल्यावर त्यांच्या आसनावर बसत होते. दिव्यांगांनी या प्रवाशांना आमच्या डब्यात का चढलात, असा प्रश्न केला तर सुदृढ प्रवासी दिव्यांगांशी वाद घालत होते. या रोजच्या भांडणामुळे दिव्यांग प्रवासी त्रस्त होते. त्यांनी याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. कल्याण येथील रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा जवानांची विशेष पथके ठाणे ते बदलापूर रेल्वे स्थानकांच्या फलटावर तैनात करण्यात आली होती.

हेही वाचा >>> “मी राज्य विधीमंडळाचा सदस्य, मला…” इतर मतदारसंघात निधी देण्यावरून आमदार कथोरेंची स्पष्टोक्ती

या पथकांनी बुधवारी संध्याकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत २७६ प्रवाशांना दिव्यांग डब्यातून प्रवास करताना पकडले. यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकातून ७२, डोंबिवली ६७, कल्याण ८०, बदलापूर ५७ सुदृढ प्रवाशांना जवानांनी ताब्यात घेतले. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी कल्याण रेल्वे न्यायालयात विशेष न्यायालय सुरू करून संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत न्यायाधीश स्वयम चोपडा, विशेष सुरक्षा आयुक्त ऋषी कुमार शुक्ला यांनी दोषी प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. आणि पुन्हा दिव्यांग डब्यातून प्रवास करताना आपण आढळून आलात तर आपणास तुरुंगात पाठवले जाईल, असा इशारा न्यायालयाने या प्रवाशांना दिला.