ठाणे : नववर्ष स्वागत आणि पूर्वसंध्येला मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या आणि त्यांच्यासोबतच प्रवास करणाऱ्या ६५९ जणांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ३०,३१ डिसेंबरला मध्यरात्री आणि १ जानेवारीला पहाटे ही कारवाई करण्यात आली अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जमणाऱ्या जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर ठाणे वाहतूक विभागानेही मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात बडगा उगारण्यास सुरूवात केली. त्यानुसार, ३० डिसेंबरला १५६ जणांविरोधात कारवाई करण्यात आली. तर ३१ डिसेंबरला २३३ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. नव्या वर्षात १ जानेवारीला पहाटे पर्यंत २७० जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.

Story img Loader