डोंबिवली- येथील उल्हास खाडी किनारच्या कुंभारखाणपाडा भागातील हरितपट्ट्यात नव्याने बांधण्यात येत असलेल्या बेकायदा इमारतीचा पाया आणि पहिल्या माळ्यासाठी उभारण्यात येत असलेले काँक्रीटचे खांब पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केले. तसेच, रेतीबंदर रस्त्यावरील राहुलनगरमध्ये बेकायदा इमारती उभारणाऱ्या चार ते पाच भूमाफियांना ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत.

कुंभारखाणपाडा हरितपट्ट्यातील बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी डोंबिवलीतील एक नागरिक मुंबईत आझाद मैदान येथे उपोषणास बसला आहे. उपोषणाचा सोमवारी चौदावा दिवस आहे. नगरविकास विभागाने या उपोषणकर्त्याच्या तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या आदेशावरुन ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा कर्पे यांनी हरितपट्ट्यातील निर्माणाधिन असलेल्या बेकायदा इमारतीवर कारवाई केली.

Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

हेही वाचा >>>मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास कुणबी सेनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांची माहिती

या भागातील इतर बेकायदा इमारतींवर पोलीस बंदोबस्त मिळेल त्याप्रमाणे नियोजनाने कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. हरितपट्ट्यात १० बेकायदा इमारती बांधण्याचे माफियांचे नियोजन आहे. त्यामधील पाच ते सहा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारती जमीनदोस्त करण्याची उपोषणकर्ते जोशी यांची मागणी आहे.हरितपट्ट्यात उभारण्यात आलेल्या या बेकायदा इमारतींमध्ये एकूण आठहून अधिक माफियांचा सहभाग आहे. त्यांच्यावर पालिकेने यापूर्वीच एमआरटीपीची कारवाई केली आहे. तसेच, या इमारती अनधिकृत म्हणून घोषित केल्या आहेत.

राहुलनगरमध्ये नोटिसा

ह प्रभागातील रेतीबंदर क्राॅस रस्त्यावरील राहुलनगर मधील चार ते पाच बेकायदा इमारतींना ह प्रभाग कार्यालयाने जमिनीची मालकी, पालिकेच्या बांधकाम परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये पालिकेने एका १२ माळ्याच्या इमारतीला परवानगी दिली आहे. या इमारतीला पोहच रस्ता नसल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीत स्पष्ट झाले. या बेकायदा इमारती पालिकेचा १५ मीटरचा विकास आराखडा बाधित करुन बांधण्यात आल्या आहेत. या भूमाफियांंनी विहित वेळेत त्यांची आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाहीतर त्यांच्यावर प्रशासनाकडून एमआरटीपी आणि बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा >>>कल्याण-कसारा दरम्यान तिकीट तपासणीसकडून बोगस रेल्वे कर्मचाऱ्याला अटक

“ उपोषणकर्त्याची तक्रार विचारात घेऊन कुंभारखाणपाडा हरितपट्ट्यातील एका निर्माणाधिन इमारतीवर कारवाई केली. उपलब्ध पोलीस बंदोबस्त आणि नियोजन करुन उर्वरित इमारतींवर कारवाईचे नियोजन आहे. राहुलनगर मधील सर्व बेकायदा बांधकामधारकांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.”स्नेहा कर्पे ,साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली पश्चिम.