लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसात तीन बेकायदा इमारतींवर प्रभाग अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली. सलग दोन दिवसांच्या या कारवाईने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त

डोंबिवली पश्चिमेत पालिकेच्या परवानग्या न घेता, विकास आराखड्यातील रस्ते बाधित करत माफियांनी बेकायदा इमारती उभारल्या आहेत. मागील तीन ते चार वर्षाच्या कालावधीत या सर्व बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. ह प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी नोटिसी देण्या व्यतिरिक्त या इमारतींवर कारवाई केली नाही. त्यानंतरचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी ह प्रभाग हद्दीतील २६ हून अधिक भूमाफियांवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यातील २६ मागासवर्गीय वसतीगृहे तीन वर्ष अनुदानापासून वंचित

या गुन्हे दाखल प्रकरणांची माहिती घेऊन जुन्या आणि नव्याने उभ्या राहत असलेल्या या बेकायदा इमारतींवर आताच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांनी नियोजन करून कारवाई सुरू केली आहे. ह प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकामे उभे राहता कामा नये, असे आदेश करपे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

पुरेसा पोलीस बंदोबस्त नसताना पालिका मुख्यालयातील दोन ते तीन पोलीस घेऊन करपे यांनी मोठागाव येथील चार माळ्याची, नवापाडा येथील गणेश विद्यालयाजवळील मामल सोसायटीजवळील सात माळ्याची, जुनी डोंबिवलीतील भारतमाता शाळेजवळील सात माळ्याच्या बेकायदा इमारतींवर कारवाई केली. या इमारती निवासयोग्य करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या होत्या.कारवाई सुरू असताना करपे यांच्यावर विविध प्रकारचे राजकीय दबाव आणून कारवाई रोखण्याचा प्रयत्न काही भूमाफियांनी प्रयत्न केला, त्याला करपे यांनी दाद दिली नाही.

आणखी वाचा-विटावा-ठाणे पादचारी पुलामुळे हजारो नागरिकांना दिलासा

रस्ते अडविणाऱ्यांवर कारवाई

डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे काळुबाई देवी मंदिराजवळ, कबु छाया बंगल्याच्या बाजुला भूमाफिया जितू म्हात्रे यांनी पालिकेचा १५ मीटरचा विकास आराखड्यातील रस्ता अडवून सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. अनेक महिने रखडलेली ही इमारत पूर्ण करून ही इमारत रहिवास योग्य करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या आहेत. अशीच इमारत सुभाष रस्त्यावर अशोक कांबळे याने बांधली आहे. याशिवाय राहुलनगरमध्ये तीन माफियांनी बेकायदा इमारतींना पोहच रस्ते उपलब्ध नसताना इमले बांधून पूर्ण केले आहेत. या सर्व इमारती आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरून भुईसपाट करण्याचे नियोजन ह प्रभागातून सुरू आहे.

“ ह प्रभाग हद्दीतील अभिलेखावर असलेल्या बेकायदा इमारती टप्प्याने भुईसपाट करण्याचे नियोजन आहे. दसऱ्यानंतर पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा बांधकामे तोडण्याची मोहीम तीव्र केली जाणार आहे.” -स्नेहा करपे,साहाय्यक आयुक्त. ह प्रभाग, डोंबिवली.