डोंबिवली – डोंबिवली पूर्व भागात पदपथ अडविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवर सोमवारी पालिकेच्या ग प्रभाग कार्यालयाने जोरदार कारवाई केली. दुकानदारांनी पदपथावर ठेवलेले सामान, दुकानासमोर सावलीसाठी केलेले निवारे फेरीवाला हटाव पथकाने जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकले. पदपथावरील सामान जप्त करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी सकाळी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे, फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पूर्व भागातील राजाजी रस्ता, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, उर्सेकरवाडी, डाॅ. राॅथ रस्ता, शिव मंदिर रस्ता, दत्तनगर, टाटा लाईन गल्ली भागातील रस्त्यांवरील बहुतांशी दुकानदार पदपथावर सामान ठेवतात, कपडे जाहिरातीचे पुतळे उभे करून ठेवतात. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा होतो.

हेही वाचा – जमिनीचे वाद टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘सलोखा योजना’

कल्याण डोंबिवलीत हे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे आल्या आहेत. आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे असले पाहिजेत. पदपथ अडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक आणि तोडकामाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे सोमवारी सकाळी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त साबळे, पथक प्रमुख साळुंखे यांनी रेल्वे स्थानक भागात दुकानांसमोरील निवारे, सामान जप्त करण्यास सुरुवात करताच दुकानदारांची पळापळ झाली. पथकाने त्यांना सामान वाचविण्याची कोणतीही संधी न देता त्यांचे सामान तोडून टाकले. दुकानासमोर पदपथ अडवून सावलीसाठी तयार केलेले निवारे काढून टाकले.

मागील आठ महिन्यांपासून डोंबिवली पूर्व ग प्रभागात एकही फेरीवाला दिसणार नाही अशा पद्धतीने पथक प्रमुख साळुंखे यांनी फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईने वर्षानुवर्ष रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमध्ये अस्वस्थता आहे. काही रेल्वे कर्मचारी फेरीवाल्यांना पाठबळ देत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. कारवाई पथक पुढे गेले की पाठीमागून लपून बसलेले फेरीवाले पुन्हा रस्त्यावर येऊन व्यवसाय करतात. त्यामुळे कारवाई पथकाची तारांबळ उडत आहे. रेल्वे स्थानक भागात आडोशाला बांधून ठेवलेले मंचक, सामान पथकाने जप्त केले. काही फेरीवाले ग प्रभाग अधिकाऱ्यांकडून आक्रमक कारवाई सुरू असल्याने त्यांच्या खोट्या तक्रारी वरिष्ठांकडे करत आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीत ‘कोयता’ टोळीचा महिलेच्या घरात धुडगूस

टाटा नाका परिसर स्वच्छ

डोंबिवली पूर्वेतील टाटा नाका, गोळवली भागात रस्त्यावर बसून भाजीपाला, सामान विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कारवाई सुरू केली आहे. कल्याण-शीळ रस्त्यावर बसून फेरीवाले व्यवसाय करत असल्याने दररोज गोळवली, टाटा नाका भागात वाहन कोंडी होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा रस्त्यावरील बाजार साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी गेल्या आठवड्यापासून हटविण्यास सुरुवात केली आहे. दररोज या भागात कारवाई करून मुख्य रस्त्यावर एकही फेरीवाला बसणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे, असे मुंबरकर यांनी सांगितले.