कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत म्हैसवर्गातील जनावरांचे बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेच्या बाजार शुल्क आणि परवाना विभागाने कारवाई केली आहे. या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे दुकान विक्रीचे गाळे पालिकेकडून बंद करण्यात आले आहेत.

पालिका हद्दीत मांस विक्री करताना पालिकेच्या बाजार शुल्क विभागाचा परवाना घेणे आवश्यक असते. पालिका हद्दीत अनेक ठिकाणी म्हैसवर्ग जातीमधील जनावरांचे मांस बेकायदा उघड्यावर विकले जात असल्याच्या तक्रारी पालिकेच्या बाजार शुल्क परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्याकडे वाढत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार शुल्क परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर, निरीक्षक प्रांजल बागडे, प्रशांत धिवर, सज्जाउद्दीन पिरजादे, पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे, के. पी. कांगडे यांच्या पथकाने कल्याण शहराच्या तक्रारप्राप्त विविध भागात अचानक छापे टाकून बेकायदा मांस विक्रेत्यांवर कारवाई केली.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

हेही वाचा – डोंबिवलीतील सागाव येथील नोकरदाराची सतरा लाखाची फसवणूक

विठ्ठलवाडी येथील विनायक काॅलनी वसाहतीत शौकत कुरेशी आणि त्यांचे सहकारी अवैध मांस विक्री करत होते. त्यांच्या दुकानातून १० किलो म्हैसवर्ग जातीचे मांस जप्त केले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कुरेशी यांचा गाळा पालिका अधिकाऱ्यांनी बंंद (सील) केला. बेकायदा मांस विक्रीबद्दल यापूर्वीही कुरेशी यांचा मांस विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला होता, असे बाजार परवाना विभागाच्या अभिलेखातून उघडकीला आले आहे. नेतिवली भागातील रामनगर खदान टेकडी भागात पालिकेचे पथक पोहोचताच दुकानदाराने गाळा बंद करून तेथून पळ काढला. पत्रीपुलाजवळील मेट्रो माॅलसमोरील गफूल डोन शाळेजवळ युसुफ गौसु शेख यांच्या दुकानातून पथकाने पाच किलो मांस जप्त केले. त्याचेही दुकान पालिकेकडून बंद करण्यात आले. ही कारवाई यापुढे अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे, असे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याण पूर्वेत बगीचा आरक्षणावरील शिवसेनेचे लोकसभा निवडणूक कार्यालय थाटात उभे

महापालिका अधिनियमाप्रमाणे पालिका हद्दीत मांंस विक्री करण्यापूर्वी पालिकेकडून परवाना घेणे आवश्यक आहे. जे विक्रेते परवाना नसताना अवैध मार्गाने मांंस विक्री करत आहेत, त्यांंच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे बेकायदा मार्गाने मांस विक्री करण्याचा प्रयत्न विक्रेत्यांनी करू नये. – प्रसाद ठाकूर, साहाय्यक आयुक्त, बाजार परवाना शुल्क विभाग.