लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: विधानसभा निवडणूकीचे काम करण्यास नकार देणाऱ्या विविध शासकीय निमशासकीय आस्थापनातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. पाच वर्षातून एकदा होणाऱ्या निवडणुकीतील या राष्ट्रीय कर्तव्यास नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण ६ हजार ९५५ मतदान केंद्रे असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण ७ हजार ७१७ मतदान केंद्राध्यक्ष, ७ हजार ७१७ मतदान अधिकारी आणि १५ हजार ४३४ इतर मतदान अधिकारी अशा एकूण ३० हजार ८६८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. परंतु अनेक कर्मचारी त्यांना प्राप्त झालेले निवडणूक कर्तव्य आदेश रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

आणखी वाचा-Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”

तसेच यासाठी अनेकजण विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या शिफारशी घेवून तसेच आजारपणाचा दाखला घेवूनही मोठ्या प्रमाणावर येत असल्याची बाब समोर आली आहे. ज्यांच्या आरोग्यविषयक अडचणी खऱ्या आहेत, त्यांच्याबाबतीत प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतली आहे. परंतू, निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असून कर्मचाऱ्यांकडून अशा पध्दतीचे वर्तन अपेक्षित नसल्याचेही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे. निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून अशा प्रकारे जे कर्मचारी निवडणुकीसाठी त्यांना प्राप्त झालेले आदेश नाकारतील, निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहतील किंवा निवडणुकीच्या कामात हयगय करतील, त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार थेट कारवाई करावी, असे निर्देश ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.