लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे – येथील ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नृत्य, काव्य, संगीत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अभिनेते, दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांना कलागंध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Nana Patekar and Aamir Khan News
Aamir Khan : आमिर खानचं नाना पाटेकरांच्या प्रश्नाला उत्तर, “मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, कारण दोन भिन्न भूमिकांची तुलना…”
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार

ठाण्यातील ‘ठाणे आर्ट गिल्ड’ (टॅग) या संस्थेतर्फे नाट्य, नृत्य, चित्रपट, काव्य, साहित्य, चित्रकला, पाककला अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्यात येते. या संस्थेला यंदा ११ वर्ष पुर्ण होत आहेत. यानिमित्त संस्थेतर्फे वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संस्थेतर्फे मागील दहा वर्षापासून दर महिन्याला एक प्रायोगिक नाटक व आंतरराष्ट्रीय चित्रपट आयोजित केला जातो. तसेच चित्रपट महोत्सव, काव्य संमेलन, एकांकिका स्पर्धा, लघुपट स्पर्धा, पाककला स्पर्धा, अभिवाचन असे विविध उपक्रम संस्था राबवित असते.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्ग खड्डेमुक्तीच्या मार्गावर, पावसाळ्यापर्यत काम पुर्ण करण्याच्या सूचना

संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त या वर्षापासून कला क्षेत्रातील तरूण, होतकरू कलाकारांना ‘कलागंध’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यंदा प्रसिद्ध अभिनेते कुशल बद्रिके यांच्या हस्ते अभिनेते, दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा वर्धापनदिन सोहळा शनिवार, १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे. तसेच नृत्य, काव्य, संगीत याच बरोबर ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार कै. रत्नाकर मतकरी यांच्या ‘विठो रखुमाय‘ या नाटकावर आधारित हर्षदा बोरकर लिखित ‘डिट्टो रखुमाय’ ही एकांकिका सादर केली जाणार आहे.

Story img Loader