डोंबिवली- दूरचित्रवाणी आणि अनेक नाटकांमधून विनोदी भूमिका साकारणारे ज्येष्ठ रंगकर्मी विजय साळवी यांचे येथे शनिवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – कल्याण : ‘खिडकी वडा’चे संस्थापक यशवंत वझे यांचे निधन

हेही वाचा – महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात मूकमोर्चा, कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलनाचा राष्ट्रवादीचा इशारा

विजय साळवी अनेक वर्षे विलेपार्ले येथे वास्तव्याला होते. ते नंतर डोंबिवलीत राहण्यास आले होते. बालनाट्य, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका, ‘मोरूची मावशी,’ ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकांमध्ये, ‘चार दिवस सासुचे’ या चित्रपटात, आभाळमाया, चिमणराव या मालिकांमध्ये विजय साळवी यांनी विनोदी भूमिका साकारल्या. ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे, विजया मेहता, विनय आपटे यांच्याबरोबर त्यांनी काम केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor vijay salvi died at the age of 84 in dombivli ssb