खरेदीसोबत बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या पहिल्या आठवडय़ाच्या भाग्यवान विजेत्या ठरलेल्या ठाण्यातील नीता धारप यांनी ‘महिंद्रा गस्टो’ स्कूटर पटकावण्याचा मान मिळवला. ठाण्यातील नौपाडा येथील घंटाळी मंदिर परिसरातील तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये बुधवारी सायंकाळी ‘शॉिपग फेस्टिव्हल’च्या विजेत्यांना अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरांत सुरू असलेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चा पहिला आठवडा यशस्वीपणे पार पडला. खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी असल्यामुळे ‘फेस्टिव्हल’मध्ये सहभागी १७० दुकानांत ग्राहकांची    झुंबड उडत आहे. दैनंदिन आणि पहिल्या आठवडय़ातील भाग्यवान विजेत्यांना बुधवारी सायंकाळी तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये सन्मानित करण्यात आले. यामध्ये नीता धारप यांनी ‘गस्टो’ पटकावली; तर चेतना पनगाम, स्नेहल कदम आणि नेहा भिगे या तिघांना प्रत्येकी एक एलईडी टीव्ही देण्यात आला. याशिवाय अमोल गोजे यांना मोबाइल संच देण्यात आला. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. तन्वी हर्बलच्या डॉ. मेधा गिरीश मेहेंदळे, डॉ. मानसी पुष्कराज धामणकर, डॉ. ऋचा प्रतीक पै आणि इंडियन एक्स्प्रेसचे तरुण तिवाडी, सुब्रोतो घोष आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी वामन हरी पेठे सन्स, ठाणे यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, अंकुर ज्वेलर्सकडून चांदीचे २० ग्रॅमचे नाणे, कलानिधी, ठाणे यांच्याकडून पैठणी साडी, जैन ट्रेडर्स यांच्याकडून एलईडी टीव्ही, मॅक इलेक्ट्रॉनिक्सकडून मोबाइल संच, रेमंड्स आणि टायटनकडून गिफ्ट व्हॉऊचरची पारितोषिके विजेत्यांना प्रदान करण्यात आली.

स्वप्नातही विचार आला नव्हता
‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने ‘महिंद्रा गस्टो’सारखी स्कूटर बक्षीस म्हणून मिळेल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ही संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’ आणि ‘महिंद्रा’चे आभार, असे फेस्टिव्हल वारंवार व्हावेत, असे मला वाटते.
नीता धारप, आठवडय़ातील पहिल्या भाग्यवान विजेत्या

स्तुत्य उपक्रम
‘लोकसत्ता’ने वाचकांशी जोडून घेण्यासाठी सुरू केलेला हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून केवळ २५० रुपयांच्या खरेदीवर मिळणारी हजारो रुपयांची बक्षिसे म्हणजे छोटी गुंतवणूक आणि मोठा लाभ होत आहे. या उपक्रमामुळे वाचकांना खरेदीसाठी प्रोत्साहन मिळतेच, शिवाय वाचकांशी जोडलेही जाता येते.
– स्वप्नाली पाटील, अभिनेत्री

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी
* लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या वरील दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा अधिक किमतीची खरेदी करून या उपक्रमात सहभागी होता येईल.
* खरेदी झाल्यानंतर दुकानामधून एक कुपन दिले जाईल, हे कुपन पूर्ण भरून दुकानात ठेवण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्यात यावे.
* या ड्रॉप बॉक्समधून प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. तर फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांना कार, विदेश यात्रा, एल.ई.डी., टीव्ही, फ्रीज, मोबाइल्स, सोन्याची नाणी अशी आकर्षक पारितोषिके दिली जातील.
* विजेत्यांची नावे लोकसत्ता ठाणेमधून प्रसिद्ध केली जातील.
* ज्वेलरी शॉप्समध्ये तीन हजार व त्याहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्यांस कूपन देण्यात येणार आहे. तर द रेमंड शॉप्समध्ये अडीच हजार व त्याहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्यांना कुपन्स उपलब्ध होतील.