स्वा. सावरकर यांच्या गौरवशाली इतिहासाची माहितीच नाही. ते या विषयावर काय बोलणार आणि सावरकरांवरील राहुल गांधींच्या टीकेवरुन ते कसला निषेध करणार. त्यांना या टीकेचे गांभीर्यच कळले नाही, असे वक्तव्य करत केंद्रीय सुक्ष्म, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे हे बालीश आहेत. त्यांना त्यांचे वडील उध्दव ठाकरे यांना सावरकर यांचा इतिहासच माहिती नाही, अशी टीका शुक्रवारी येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना केली.सावरकरांचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. शिवसेनाप्रमुख सावरकरांना का मानत होते हे आदित्य ठाकरेंना माहिती नाही. त्यामुळे ते राहुल गांधींच्या सावरकरांवरील व्देषमुलक वक्तव्याचा कसा काय निषेध करतील आणि कसली चीड व्यक्त करतील. टीका करण्यापूर्वी अगोदर इतिहास माहिती असावा लागतो, असे सांगत मंत्री राणे यांनी आदित्य हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत फक्त स्वताची छबी काढण्यासाठी गेले होते, अशी टीका केली.
हेही वाचा >>>ठाणे: उद्योजक डाॅ. मधुसूदन खांबेटे यांचे निधन
अनेक दशके काँग्रेस देशाच्या सत्तेत आहे. त्यावेळी कधी भारत फिरण्याची इच्छा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली नाही. मग आत्ताच ही आठवण येण्या मागचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करत मंत्री राणे यांनी अशाप्रकारची यात्रा काढून राहुल गांधी स्वताच्या जीवाची घालमेल करुन घेत आहेत. भारत जोडण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या जोडो यात्रेत एकतरी काँग्रेसचा कार्यकर्ता दिसतो का. सगळे जुनेच तेच तेच चेहरे बघण्यास मिळाले, असे राणे यांनी सांगितले.सत्ता हे लक्ष ठेऊन आता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. या तीन पक्षांची तोंडे वेगळी, मने जुळलेली नाहीत. हे फक्त सत्तेसाठी एकत्र येत असल्याने त्यांना यश मिळणार नाही, अशी खोचक टीका राणे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>कल्याण: टिटवाळा-मांडा मधील ४७ रहिवाशांवर वीज चोरीप्रकरणी फौजदारी कारवाई
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांना मंत्री राणे यांनी लक्ष्य केले. माझ्या शिफारशींमुळे नीलमताई शिवसेनेत आहेत. अन्यथा त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिपद न मिळाल्याने त्या नाराज होत्या. आपल्या वक्तव्यामुळे त्यांना आता सगळे स्मरण होईल, अशी उपरोधिक टीका राणे यांनी केली.सुप्रिया सुळे यांच्या बदला घेण्याच्या राजकारणावर बोलताना राणे यांनी यापूर्वी बदले घेतले जायाचे ते सांगितले आणि दाखविले जात नसत. बुखारींपासून ते आतापर्यंत किती बळी गेले ते नावासकट जाहीर करतो. हे ताईंना जाऊन सांगा, असे राणे म्हणाले. आम्ही विकास कामांच्या बळावर सत्तास्थानी येत आहोत, असे राणे यांनी स्पष्ट केले.
मुंबई गोवा रस्त्याचे काम आता गतीने सुरू झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे या रस्त्यावर बारकाईने लक्ष आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.