स्वा. सावरकर यांच्या गौरवशाली इतिहासाची माहितीच नाही. ते या विषयावर काय बोलणार आणि सावरकरांवरील राहुल गांधींच्या टीकेवरुन ते कसला निषेध करणार. त्यांना या टीकेचे गांभीर्यच कळले नाही, असे वक्तव्य करत केंद्रीय सुक्ष्म, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे हे बालीश आहेत. त्यांना त्यांचे वडील उध्दव ठाकरे यांना सावरकर यांचा इतिहासच माहिती नाही, अशी टीका शुक्रवारी येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना केली.सावरकरांचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. शिवसेनाप्रमुख सावरकरांना का मानत होते हे आदित्य ठाकरेंना माहिती नाही. त्यामुळे ते राहुल गांधींच्या सावरकरांवरील व्देषमुलक वक्तव्याचा कसा काय निषेध करतील आणि कसली चीड व्यक्त करतील. टीका करण्यापूर्वी अगोदर इतिहास माहिती असावा लागतो, असे सांगत मंत्री राणे यांनी आदित्य हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत फक्त स्वताची छबी काढण्यासाठी गेले होते, अशी टीका केली.
आदित्य, उध्दव ठाकरे यांना सावरकरांचा इतिहासच माहिती नाही; डोंबिवलीतील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका
स्वा. सावरकर यांच्या गौरवशाली इतिहासाची माहितीच नाही. ते या विषयावर काय बोलणार आणि सावरकरांवरील राहुल गांधींच्या टीकेवरुन ते कसला निषेध करणार.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-11-2022 at 20:12 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray and uddhav thackeray do not know the history of savarkar criticizes narayan rane amy