ठाण्यामधील गायमुख येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी घोडबंदर रोड येथील बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण सोहळा पार पडला. आदित्य ठाकरे यांनी इतरही काही विकास कामांचे भूमिपूजन केले. मात्र ठाण्यात आलेल्या आदित्य ठाकरेंना रस्त्यांवरील खड्ड्यांचा आणि त्यामुळे झालेल्या वाहतुककोंडीचा चांगलाच फटका बसला. आनंदनगर टोल नाक्यावर आदित्य ठाकरेंचे स्वागतच खड्डे आणि वाहतुककोंडीने झाले. अगदी घोडबंदर रोडवरही अनेक ठिकाणी आदित्य ठाकरेंचा ताफा खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतुककोंडीत अडकल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेची सत्ता असणाऱ्या ठाण्यातील खड्यांचे खापर आदित्य ठाकरेंनी मेट्रो प्रशासनावर फोडले आहे.
तिनहात नाका, कापूरबावडी तसेच घोडबंदर रोडवर अनेक ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्या वाहतुककोंडीत अडकल्याचे पहायला मिळाले. यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी ‘मेट्रोच्या कामांसहीत अनेक ठिकाणी एकाच वेळी विकासकामे ठाण्यात सुरु आहेत त्यामुळे वाहतुककोंडी होताना दिसते,’ असे मत नोंदवले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांचे उद्घाटन तसेच भूमीपूजन आदित्य ठाकरे यांनी केले. गायमुखमधील चौपटीबरोबरच इलेक्ट्रिक स्मार्ट ट्रायसायकलचे उद्घाटन केले. तसेच कासारवडवली येथील ठाणे महानगरपालिकेच्या आगरी- कोळी (आदिवासी) भवनाचा भूमिपूजन सोहळा आणि मानपाड्यातील वनस्थळी उद्यान लोकार्पण सोहळाही आदित्य ठाकरेंच्या हस्ते पार पडला.
१)
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या हस्ते आज घोडबंदर रोड, ठाणे येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण सोहळा पार पडला.
.
Yuvasena President @AUThackeray inaugurated the newly constructed HinduHridaysamrat Balasaheb Thackeray Chowpatty at Godhbandar Road pic.twitter.com/yofCHmhACw— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 15, 2019
२)
युवासेनाप्रमुख @authackeray यांच्या हस्ते आज कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे येथे ठाणे महानगरपालिकेच्या आगरी- कोळी (आदिवासी) भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
.
.
Yuvasena President Aaditya Thackeray laid foundation stone for “Agri- Koli Bhavan” at Kasarvadavali, Thane today. pic.twitter.com/fnhXbUjehW— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 15, 2019
३)
युवासेनाप्रमुख @authackeray यांच्या हस्ते आज मानपाडा, ठाणे येथे वनस्थळी उद्यान लोकार्पण सोहळा पार पडला.
.
Yuvasena President Aaditya Thackeray inaugurated the newly constructed Thane Municipal Corporation’s Vansthali Park at Manpada, Thane today. pic.twitter.com/oX6J0TEqaH— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 15, 2019
४)
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांनी आज गायमुख, ठाणे येथे इलेक्ट्रिक स्मार्ट ट्रायसायकलचे उद्घाटन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली. pic.twitter.com/9nl5ZVUS0f
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 15, 2019
दरम्यान, ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेला आता मॅरेथॉन स्पर्धेच्या तोंडावर खड्डेभरणीची आठवण झाली आहे. मॅरेथॉन मार्गाच्या पाहणीदरम्यान रस्त्यांची झालेली चाळण पाहून संतापलेल्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली होती. त्यामुळे गुरुवारपासून पालिकेने रस्त्यांची डागडुजी करण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली.