शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांकडून समर्थन मिळत असून शिवसेनेच्या गडातील पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे गुरुवारी सकाळी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची भिवंडी व शहापूर येथे निष्ठा यात्रा होणार आहे. या निमित्ताने ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आंदनगर नाक्यावर त्यांच्या स्वागतानिमित्ताने शिववसैनिकांकडून शक्ती प्रदर्शन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवसेनेने अद्याप जिल्हा प्रमुख जाहीर केलेला नाही –

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील सेनेच्या गडाला सुरुंग लागले आहे. शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांकडून समर्थन मिळत असून यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे.

तर, शिवसेनेने अद्याप जिल्हा प्रमुख जाहीर केलेला नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा गुरुवारचा ठाणे जिल्ह्याचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. आदित्य ठाकरे यांचे धर्मवीरांच्या ठाणे नगरीत सकाळी आगमन होणार असून तेथे त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक जमले आहेत. येथून आदित्य ठाकरे हे भिवंडी व शहापूर येथे निष्ठायात्रे करिता जाणार आहेत.