कल्याणमधील चिकणघर येथील १२४ कोटी रुपयांच्या ‘टीडीआर’ घोटाळ्यातील पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी नगररचनाकार रघुवीर शेळके, कनिष्ठ अभियंता शशीम केदार यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करावी, असे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहेत.
‘टीडीआर’ घोटाळा झाला त्या वेळी रामनाथ सोनवणे पालिकेचे आयुक्त, चंद्र प्रकाश सिंह नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक नगररचनाकार होते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घातले आहे. चिकणघर येथील आरक्षित जागेचा जमीन मालकाला टीडीआर दिल्यानंतर, जागा पालिकेच्या ताब्यात आली की अतिक्रमणे पालिकेने तातडीने काढून टाकावीत. अतिक्रमणे पूर्वीपासून असतील आणि टीडीआर जागा मालकाला देण्यात आला असेल तर मालकाकडून मोकळी जमीन मिळेपर्यंत टीडीआर वापरण्यास त्यांना मज्जाव करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा