कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या काही भागांत शेतकऱ्यांनी सगुणा पद्धतीने भात लागवड केलेल्या लोम्बीमध्ये भेसळयुक्त बियाणे बाहेर आल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून येत आहेत. कृषी विभागाकडून दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना जूनमध्ये लागवडीसाठी देण्यात आले होते. त्या बियाणात कसूरता दिसून आल्याने शहापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सगुणा राईस तंत्रज्ञानाने (एस. आर. टी.) भात लागवड करावी म्हणून जिल्हा, तालुका कृषी विभागाकडून शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये जून, जुलैमध्ये विशेष जागृती मोहीम राबविली. सगुणा तंत्रज्ञानाने भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने दर्जेदार रत्नागिरी आठ बियाणे उपलब्ध करून दिले. काही पिके ७० ते ८० दिवसांत तयार होणारी निम गरवी, तर काही पिके १४० दिवसांची गरवी पिके आहेत. जुलैमध्ये या बियाणांची लागवड केल्यानंतर रत्नागिरी आठ बियाण्याची लागवड केलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतात दाणा नसलेली लोम्बी, लोम्बीला फक्त टोकदार पाते, दाण्याने भरलेल्या लोम्बीत भेसळयुक्त लाल दाणे (बरड, कचोरा) आढळून आला आहे. शेतामधील लोम्बीसाठी उंचावलेले भात एक समान नसल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. हा प्रकार पाहून काही शेतकऱ्यांनी शहापूर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे, कृषी साहाय्यकांकडे तक्रारी केल्या आहेत. वर्षभराची लागवड फुकट गेल्याने काही शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कृषी विभागाने या भात पिकांची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कापणीला आलेल्या भातात भेसळ नको म्हणून भेसळयुक्त लोम्ब्या शेतकऱ्यांनी विळ्याने कापून टाकल्या आहेत. रत्नागिरी आठ बियाणे इतर शेतांमध्ये मात्र एक समान, भरघोस आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतात या बियाणामध्ये फरक का पडला असे प्रश्न शेतकऱ्यांकडून केले जात आहेत.
हेही वाचा – ठाणे : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी
“एसआरटी तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून दिले होते. जिल्ह्यात या तंत्रज्ञानातील पिक उत्तम पद्धतीने भरघोस आले आहे. एखाद्या शेतकऱ्याची तक्रार असेल तर त्याची शेताची पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल.” – दीपक कुटे, जिल्हा कृषी अधिकारी, ठाणे.
हेही वाचा – सत्ता असूनही पोलिसांचा दुजाभाव; कल्याणमधील पदाधिकाऱ्यांचे फडणवीस यांच्यापुढे गाऱ्हाणे
“गावातील सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिलेल्या भात बियाणाप्रमाणे आपणास एक पिशवी जूनमध्ये मिळाली. आता भात लोम्बीवर आल्यानंतर लोम्बीमध्ये भात दाणे नसलेला तुरा, भेसळयुक्त भात दाणा आणि असमान पद्धतीेने शेतात भाताची उगवण झाली असल्याचे दिसून आले. याप्रकरणी तालुका कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. ” – शरद मंडलिक, शेतकरी, शेणवे, शहापूर.