सागर नरेकर, निखिल अहिरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : शेतकऱ्यांच्या नव्या पिढीमध्ये भातशेतीबद्दल असलेला निरुत्साह, शेती करणाऱ्यांसाठी आवश्यक कुशल मजुरांची कमतरता आणि त्यांच्या मजुरीबाबत असलेल्या अपेक्षा पाहता गेल्या काही वर्षांत भात शेती तोटय़ाची बनली आहे. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा सल्ला दिला जातो. शहापूर तालुक्यातील वेडवहाळ गावातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष यांत्रिक शेतीचा प्रयोग पूर्ण केल्या आहेत. यामुळे आर्थिक उत्पादनात वाढ झाले आहे.
पारंपरिक शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन शेतकऱ्यांनी विविध पिकांचे उत्पादन घ्यावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने अनेक योजना आणि उपक्रम राबविले जातात. याच अंतर्गत शहापूर तालुक्यातील वेडवहाळ गावात खरीप हंगामापूर्वी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये गावातील काही शेतकऱ्यांची लागवडी पासून पूर्णपणे यंत्राद्वारे गटशेती करण्यासाठी निवड करण्यात आली होती. गावातील सुमारे २५ एकर क्षेत्रावर हा प्रयोग राबविण्यात आला होता. या शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत शेतकऱ्यांना लागवड आणि कापणी दरम्यान उपयोगात येणाऱ्या यंत्रांची माहिती देण्यात आली होती. या नंतर लागवडी योग्य पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांकडून आखणी करण्यात आलेल्या क्षेत्रावर मॅट नर्सरी तयार करून यंत्राद्वारे भात रोपांची लागवड करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान सहभागी शेतकऱ्यांना जिल्हा कृषी विभागाकडून अझोटोबॅक्टर, पी.अस.बी., ट्रायकोडर्मा, नॅनो युरिया, फेरोमन ट्रॅप, बांधावर तूर, युरिया ब्रिकेट निविष्ठा सहभागी शेतकऱ्यांना पुरवण्यात आल्या.
दरम्यान कीडनाशक फवारणी करणे यांबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. सध्या कापणीचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांकडून कापणी यंत्राच्या साहाय्याने भात कापणी केली जाते आहे. तर काही शेतकऱ्यांची कापणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या भात उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत काही टक्क्यांनी वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. काही शेतकऱ्यांनी देखील भाडेतत्वावर कापणीचे यंत्र आणून मागील काही दिवसांपासून शहापूर तालुक्यात यंत्राद्वारे भात कापणी केली जात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
खर्चात घट, उत्पादनात वाढ आणि वेळेची बचत
लागवडी वेळी मजुरांच्या ऐवजी यंत्राचा वापर करून लागवड करून मजुरांचावर होणार अधिकचा खर्च वाचला आहे. यामुळे एका दिवसात चार ते पाच एकर क्षेत्रावर लागवड करता येणे शक्य झाले. तसेच कापणी वेळी देखील यंत्रांच्या साहाय्याने प्रक्रिया होत असल्याने यावेळी देखील मजुरांवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च वाचला आहे.
पारंपारिक शेतीला यंत्रांची साथ लाभल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यायचे आहे त्यांना mahadbt.it या संकेस्थळावर अर्ज करता येणार आहे.
– दीपक कुटे, कृषी अधिकारी, ठाणे.