ठाणे: मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या फटाकेबाजीमुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरात मध्यरात्रीच्या वेळेत हवा प्रदुषणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी उल्हासनगर आणि बदलापूर येथील हवा तुलनेने सर्वाधिक प्रदूषित होती. उल्हासनगर आणि बदलापूर शहरातील हवेचा निर्देशांक वाईट स्तरावर होता. तसेच सर्वच शहरात पीएम २.५ या घटकाचे प्रमाण धोकादायक आणि अतिधोकादायक पातळीवर गेले होते.

मुंबई महानगरांमध्ये हवेचा दर्जा खालावल्याने दिवाळीच्या कालावधीत रात्री ८ ते १० या कालावधीत फटाके वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, उल्हानगर, बदलापूर आणि भिवंडी शहरात रात्री उशीरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच असल्याचे चित्र आहे. सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे चित्र होते. सोमवारी उल्हासनगर शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट स्तरात म्हणजेच ३२२ इतका नोंदविण्यात आला होता. तर बदलापूरमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरात म्हणजेच २३१ इतका नोदविण्यात आला आहे.

pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

हेही वाचा… नागपूर: मेडिकलच्या स्वयंपाकगृहाचा डोलारा केवळ नऊ कर्मचाऱ्यांवर; मुख्य स्वयंपाकीसह ४१ पदे रिक्त

उर्वरित ठाणे, कल्याण आणि भिवंडी शहरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम स्तरात नोंद झाला आहे. ठाणे शहरातील उपवन येथील हवेच्या गुणवत्ता निरीक्षण केंद्रात मंगळवारी २६४ या वाईट स्तरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदविण्यात आला. उल्हासनगरमध्ये २२० आणि बदलापूर शहरात २०६ या वाईट स्तरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदविण्यात आला. भिवंडीत १९५ आणि कल्याणध्ये १८१ मध्यम स्तरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदविण्यात आला आहे.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यरात्री सर्वाधिक प्रदूषित होत आहे. मध्यरात्री पीएम २.५ घटक धोकादायक आणि अतिधोकादायक पातळी गाठत आहे. सर्वच शहरात मध्यरात्री पीएम २.५ चे प्रमाण ३०० ते ५०० (मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) इतक्या प्रमाणात होते.